दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच दिल्लीतून मोठी बातमी आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संसद परिसरात कार्यालयासाठी अपात्र ठरवलं असल्याची माहिती समोर आली. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला NCP नावानेच दालन देण्यात आले आहे.
लोकसभा सचिवालयाकडून जुन्या संसद भवनामध्ये दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. लोकसभेकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला कार्यालयाचे वाटप केलं आहे. आवश्यक संख्याबळ नसल्याने अजित पवारांना लोकसभेकडून कार्यालय देण्यात आलं नाही. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (एनसीपी)' असा उल्लेख आहे. निवडणूक आयोगाने अजित पवारांना पक्ष दिल्यानंतर शरद पवारांनी पक्षाला नवे नाव आणि तुतारी हे चिन्ह घेतले होते. पण आता शरद पवार गटाकडे खासदारांची संख्या जास्त असल्यामुळे दालन मिळालं आहे.
advertisement
(तुमचा लढावू बाणा हरवला आहे की काय? एका कार्यकर्त्यांचं अजितदादांना खरमरीत पत्र, बारामतीत व्हायरल)
लोकसभेच्या नियमानुसार 8 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाला संसद परिसरात कार्यालय मिळत असतं. आज लोकसभा सचिवालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा उल्लेख आहे. मात्र यामध्ये उद्या सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेत एक तर राज्यसभेत दोन खासदार आहेत. त्यामुळे त्यांना संसद परिसरात कार्यालय मिळणार नाही अशी देखील सूत्रांनी माहिती दिली आहे.
संसद भवनात शिंदे आणि ठाकरे शेजारीशेजारी
तर दुसरीकडे, संसद भवनात आजूबाजूला मिळाले शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही पक्षांना कार्यालय मिळाले आहे. संसद परिसरात असलेल्या संविधान भवनात शिवसेना उबाठा या पक्षाला 128 ए तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 128 क्रमांकाचे कार्यालय लोकसभा सचिवालयाच्या वतीने देण्यात आलेलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 126 डी हे कार्यालय लोकसभा सचिवालयाच्या वतीने देण्यात आलं आहे.
हा मेसेज नुकताच आला आहे. तुम्ही न्यूज 18 ओडिशा वेबसाईट द्वारे खूप लवकर वाचत आहात आम्हाला अधिक माहिती मिळताच आम्ही ही पोस्ट अपडेट करू. सर्व बातम्या आणि अपडेट्स तात्काळ मिळविण्यासाठी आमच्याशी कनेक्ट रहा