लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने सुद्धा आता बैठकांचा धडका सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्री काल मुंबईत दाखल झाले. आज पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपाचा मेळावा पार पडला. राज्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
advertisement
लोकसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच अमित शाह महाराष्ट्रात आले. अमित शाह यांच्या उपस्थितीत निवडणूक रणधुमाळीचं रणशिंग फुंकलं. रविवारी भाजपकडून संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमित शाहांनी राज्यभरातील सर्व भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळावं या दृष्टीने रोडमॅप आजच्या या बैठकीत ठरवण्यात आला.
मराठा आरक्षणावरून शरद पवार रडारवर:
यावेळी भाषणात बोलताना अमित शाहांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला. कारण अमित शाह हे जाणून आहेत की या मुद्द्याचा मराठा आरक्षणावर चांगलाच परिणाम होवू शकतो. यावेळी अमित शाहांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. शाह म्हणाले की, "जेव्हा जेव्हा राज्यात भाजपाच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं, तेव्हा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं. परंतु शरद पवारांच्या आणि ठाकरेंच्या नेतृत्वात आघाडी सरकार आलं की आरक्षण जातं. त्यामुळे आता आगामी विधानसभेत जर महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर दिलेलं मराठा आरक्षण पुन्हा जाईल"
त्यामुळे आता मराठा आरक्षणावरून अमित शाहांनी थेट राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवारांवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण फक्त भारतीय जनता पक्षच कशा प्रकारे देऊ शकतो, हे देखील अमित शाहांनी यावेळी पटवून देण्याचा प्रयत्न केला. एकंदरीतच लोकसभेला आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेलं डॅमेज कंट्रोल करण्याचा मानस भाजपाचा दिसत आहे. त्यामुळे आरक्षणावरून भारतीय जनता पक्ष आता नेमकी काय रणनीती आखणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
'लोकसभा-विधानसभा एकत्र लढत असलो तरी...', महायुतीबाबत अजितदादांची मोठी घोषणा
