TRENDING:

जालन्यात महायुती फॅक्टर! अर्जुन भाऊ 100 टक्के निवडून येणार, कार्यकर्त्यांचा जल्लोष

Last Updated:

Jalna Assembly: मराठा आंदोलनाचं केंद्र राहिलेल्या जालन्यात महायुतीने आघाडी घेतली आहे. अर्जून खोतकर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली. सकाळपासूनच निकालाचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या जालना जिल्ह्यामध्ये जरांगे फॅक्टरचा परिणाम किती होतो? भाजपा आणि महायुतीला याचा फटका बसणार का? असे प्रश्न सगळ्यांच्याच मनात होते. मात्र या सगळ्या गोष्टींना बाजूला सारत निकालाचं चित्र काही वेगळंच पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील महायुतीचे पाचही उमेदवार सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहेत. जालना विधानसभेत अर्जुन खोतकर यांनी मोठी आघाडी घेतली असून कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

advertisement

जालना विधानसभेसाठी काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि महायुतीचे अर्जुन खोतकर यांच्यात काट्याची लढत होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. आठव्या फेरी अखेर अर्जुन खोतकर यांनी एक हाती वर्चस्व मिळवलं असून तब्बल 14 हजार 71 मतांची आघाडी घेतली. सुरुवातीपासूनच अर्जुन खोतकर हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत असून ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. मतमोजणी प्रक्रियेच्या शेवटपर्यंत अर्जुन खोतकर आघाडीवर राहतील  आणि मोठ्या फरकाने निवडून येतील, अशी अपेक्षा शिवसेनेच्या मतदान केंद्राबाहेर जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

advertisement

Maharashtra Elections Mahayuti : महायुती सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला, नव्या मंत्रिमंडळाचा कधी होणार शपथविधी?

View More

अर्जुन भाऊ 100 टक्के निवडून येणार आणि आम्ही दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करणार आहे. मिठाई बरोबरच ट्रक भर गुलालाची ऑर्डर देऊन ठेवली आहे. जेसीबी द्वारे गुलालाची उधळण आम्ही करणार असून आता फक्त सुरुवात आहे. हा जल्लोष मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत असाच सुरू राहील. भाऊंच्या विजयाची घोषणा होताच मोठ्या संख्येने फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात येणार आहे, अशी भावना शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

दरम्यान, जालना विधानसभेची रचना पाहिल्यास शहर आणि ग्रामीण असा दोन विभागात हा मतदारसंघ विभागलेला आहे. ग्रामीण भागात पहिल्यापासूनच शिवसेना गटाचे अर्जुन खोतकर यांचे वर्चस्व राहिलं आहे. तर शहरी भागातील मतदार हा कैलास गोरंट्याल यांच्या पाठीमागे उभा राहत असल्याचं मागील 25 वर्षांचा अनुभव आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अब्दुल हाफिज यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने कैलास गोरंट्याल यांच्या मत विभागणीची शक्यता सुरुवातीपासून वर्तवली जात होती. सुरुवातीच्या कलांमध्ये अर्जुन खोतकर यांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/Politics/
जालन्यात महायुती फॅक्टर! अर्जुन भाऊ 100 टक्के निवडून येणार, कार्यकर्त्यांचा जल्लोष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल