TRENDING:

आई गं! पुण्यातील 10 वर्षांची चिमुकली 10 महिने कळवळत होती, औषधोपचार करूनही बरं वाटेना, ऑपरेशननंतर डॉक्टरांनाही फुटला घाम

Last Updated:

Pune News : पुणे शहरातून एक विचित्र अशी घटना समोर आलेली आहे. जिथे एका चिमुकल्याच्या ऑपरेशदरम्यान डॉक्टरांना अक्षरशा भिती वाटली आहे. नेमके घडले काय ते सविस्तर जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : दररोज आपण देशभरातून विविध आजारपणाच्या संबंधित बातम्या पाहत असतो. मात्र, अशा काही घटना समोर येतात त्या सर्वांना हादरुन टाकतात त्यात अशीच एक धक्कादायक घटना पुणे शहरातून समोर आलेली आहे, जिथे दहा वर्षाच्या चिमुकलीच्या वेदनेमागचं कारण ऐकून डॉक्टरसुद्धा हादरले. नेमकं चिमुकलीसोबत काय घडलं आणि डॉक्टरांना काय समजल हे जाणून घेण्यासाठी सविस्तर बातमी एकदा वाचा.
News18
News18
advertisement

आई अगं, खूप पोट दुखतंय! पुणे शहरात कुटुंबियांसोबत ही चिमुकली वास्तव्यास आहे. तिथे तब्बल दहा महिन्यांपासून ही चिमुकली सतत पोटदुखीने त्रस्त होती. कुटुंबियांनी अनेक ठिकाणी औषधोपचार केले. मात्र, काही तिच्या वेदना होत नव्हत्या. शेवटी तिच्या पालकांनी पुण्यातील लवळे येथील एका रुग्णालयात तिला दाखल केलं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तपासणीत पोटाच्या वरच्या भागात एक मोठा, घट्ट गोळा असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तातडीने सीटी स्कॅन केल्यावर सगळंच स्पष्ट झालं की तो गोळा पोटातून आतड्यांपर्यंत आणि पित्ताशयापर्यंत पसरला होता.

advertisement

ऑपरेशनदरम्यान जे दिसलं ते पाहून डॉक्टर सुद्धा थरकापले

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिचं ऑपरेश देखील करण्यात आलं. मात्र, त्यानंतर डॉक्टरांना समजलं ते ही चिमुकली 'रपन्जेल सिंड्रोम'अशा नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. या आजारात व्यक्तीला स्वतःचे केस किंवा कापसाचे दोरे खाण्याची सवय लागते. हे पदार्थ पोटात साचून एक मोठा गोळा तयार करतात. तसंच या चिमुकलीच्या पोटातही केस आणि कापसाच्या दोऱ्यांचा तब्बल 280 ग्रॅम वजनाचा गोळा तयार झाला होता.

advertisement

चिमुकलीने घेतला सुटकेचा श्वास

डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तब्बल अडीच तास चाललेल्या या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनी काळजीपूर्वक तो गोळा बाहेर काढला. ऑपरेशनदरम्यान अनेक केस आणि दोरे एकमेकांत गुंतलेले दिसले तर काही थेट पित्ताशयापर्यंत गेले होते. हे पाहून डॉक्टर सुद्धा थक्क झाले.

शस्त्रक्रियेनंतर मुलीला आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं. सातव्या दिवशी तिच्या आतड्यात काहीही समस्या नसल्याचे समजताच तिला द्रव पदार्थ खाण्यास देण्यास सुरुवात केली. आठव्या दिवशी तिच्या मलावाटे काही दोरे बाहेर आले, जे पोटात राहिलेले उरलेले पदार्थ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या चिमुकी पूर्णपणे सुरक्षित असून तिची प्रकृतीही स्थिर आहे.

advertisement

अतिशय दुर्मिळ आजार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 1 लाख 25 हजार दिवे, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उजळले दगडूशेठ गणपती मंदिर
सर्व पहा

रपन्जेल सिंड्रोम हा आजार अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे ही घटना वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. एका चिमुकलीच्या पोटातून इतक्या मोठ्या आकाराचा केस आणि दोऱ्यांचा गोळा बाहेर काढला जाणं हे स्वतःतच धक्कादायक आहे. डॉक्टरांच्या कौशल्यामुळे तिचं आयुष्य वाचलं, पण या घटनेनं पालकांनाही सतर्क केलं आहे.

मराठी बातम्या/पुणे/
आई गं! पुण्यातील 10 वर्षांची चिमुकली 10 महिने कळवळत होती, औषधोपचार करूनही बरं वाटेना, ऑपरेशननंतर डॉक्टरांनाही फुटला घाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल