महाराष्ट्रात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस, आता 5 जिल्ह्यांना हायअलर्ट
व्हेंटिलेटरवरून हा मुलगा अगदी व्यवस्थित होऊन पुन्हा घरी परतला आहे. 11वर्षीय मुलाला पुण्यातील ससून रूग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्याला श्वसनासाठी त्रास होत असल्यामुळे 57 दिवस त्याच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. या दरम्यान त्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागले होते. उपचारादरम्यान त्याला न्यूमोनिया झाल्यामुळे त्यावर तातडीने औषधोपचार करावे लागले. दीर्घकाळ अतिदक्षता विभागात राहिल्याने या मुलाच्या शरीरात प्रथिने आणि उष्मांकाची कमतरता निर्माण झाली. वारंवार येणार्या झटक्यांमुळे औषधांच्या मात्रेत सतत बदल करावा लागत होता. संसर्गाचा धोका कायम असल्याने डॉक्टरांपासून परिचारिकांचे पथक या मुलावर सातत्याने लक्ष ठेवत होते.
advertisement
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, महिला- वृद्धांना एसटीच्या तिकीटासाठी नवीन नियम लागू
डॉक्टरांच्या आणि परिचारिकांच्या टीमने त्या मुलावर व्यवस्थित उपचार केल्यामुळे त्याची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. तब्बल दोन महिन्यांनंतर त्याला व्हेंटिलेटरवरून काढून टाकण्यात आले. अडीच महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या उपचारानंतर डॉक्टरांनी त्या मुलाला रूग्णालयातून घरी सोडलं. तब्बल दोन महिने व्हेंटिलेटर, सहा दिवस बालरोग अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. पुढे त्याला पंधरा दिवस बालरोग विभागाच्या कक्षामध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले. ६ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ह्या मुलाला २३ ऑगस्ट रोजी पूर्ण बरे झाल्यानंतरच त्याला डिस्चार्ज देण्यात आला. उपचारानंतर तो मुलगा आता सर्व गोष्टी तो त्याच्या हाताने करतो. पूर्वीसारखा आता तो दैनंदिन काम करतोय.
19 वर्षांचा नातू 3 गोळ्यात संपवला, आंदेकर टोळीच्या गँगवारची INSIDE STORY
11 वर्षीय मुलाला वडील नसल्यामुळे त्याच्या आईने हॉस्पिटलमध्ये राहून मुलाची काळजी घेतली. तिला बालरोग विभाग व वैद्यकीय समाजसेवा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी साथ दिली. तिच्या जेवणखाण्यासह इतर गोष्टींची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी उचलली. आईचे मानसिक बळ आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांनी या कठीण लढाईत निर्णायक भूमिका बजावली. बालरोगचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. उदय राजपूत आणि डॉ. राहुल दावरे, सहायक प्राध्यापक डॉ. सुविधा सरदार यांच्यासह निवासी डॉक्टर आणि परिचारिकांच्या पथकाने हे उपचार केले.
लालबाग राजाच्या विसर्जनाला उशीर, गणेशभक्तांना पडलं महागात, पोलीसही अवाक्
11 वर्षीय मुलावर उपचार करणाऱ्या ससून रुग्णालयाच्या बालरोग चिकित्साशास्त्र, विभागप्रमुख, प्रा. डॉ. आरती किणीकर यांनी सांगितले की, "धनुर्वात आजार अनेक नवजात मुलांना होताना दिसतो, कारण गर्भवतींना लसीकरण मिळत नाही किंवा प्रसूती अस्वच्छ परिस्थितीत होते. हे पूर्णपणे टाळता येऊ शकते. गर्भवतींना टिटॅनस लस देणे आणि स्वच्छ प्रसूती करणे अत्यावश्यक आहे. गर्भवतींना ही लस मिळाली नसेल तर जन्मानंतर बाळाला टिटॅनस इम्युनोग्लोब्युलिन देता येते. प्रतिबंध हा नेहमी उपचारापेक्षा अधिक परिणामकारक असतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे."
संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक ठिकाणं पाहण्याची संधी, 'हेरिटेज वॉक' बद्दल A TO Z माहिती
ससून रुग्णालयाचे डीन डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले की, "धनुर्वाताचे लसीकरण न करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. धनुर्वात आजार हा पूर्णपणे टाळता येणारा असून, त्याच्यासाठी लसीकरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही."