Lalbaugcha Raja: लालबाग राजाच्या विसर्जनाला उशीर, गणेशभक्तांना पडलं महागात, पोलीसही अवाक्
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Lalbaugcha Raja Procession : 'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणूकीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांच्या आणि दर्शनाला आलेल्या भक्तांच्याही मोबाईलवर आणि त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.
मुंबईतलं सर्वात लोकप्रिय आणि कायमच चर्चेत राहणाऱ्या गणेश मंडळांमध्ये 'लालबागचा राजा' मंडळ कायमच चर्चेत असतो. मंडळाला यावर्षी विसर्जनासाठी तब्बल तब्बल 35 तास लागले. यावर्षी पहिल्यांदाच इतक्या उशीरा या गणपतीचं विसर्जन झालं. ही विसर्जन मिरवणूक जवळपास 20 ते 22 तास चालली. इतक्या तास मिरवणूक चालल्यानंतर विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रात्री 8:30 ते 9 वाजता झाले.
मिरवणूक म्हटल्यावर हजारो प्रकारचे लोकं आपल्या आजूबाजूला असतात. त्यातीलच काही लोकंनी मिरवणूकीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांच्या आणि दर्शनाला आलेल्या भक्तांच्याही मोबाईलवर आणि त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. चोरट्यांनी 'लालबागचा राजा' ला निरोप देण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांचे गर्दीचा फायदा घेत मोबाइल आणि सोन्याचे दागिने लांबवले. संबंधित प्रकरणाच्या तक्रारी गणेशभक्तांनी काळाचौकी पोलिस स्थानकात केलेली आहे.
advertisement
काळाचौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरगाव चौपाटीवर 'लालबागचा राजा'च्या विसर्जनासाठी आणि दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांचे १०० हून अधिक फोन चोरीला गेले. या प्रकरणात काळाचौकी पोलिसांनी अद्याप चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोबाइलही ताब्यात घेण्यात आले आहेत. तसंच सोनसाखळी चोरी झाल्याच्याही अनेक तक्रारी काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंदवल्या गेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १२ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर दोन सोन्याच्या चेन यांच्याकडून ताब्यात घेतल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात संमतीशिवाय ड्रोन वापरल्या प्रकरणीही गुन्हे दाखल झाले आहेत.
advertisement
दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही विसर्जन मिरवणूकीत, लालबाग आणि परिसरात मोबाईल चोर आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्याची टीम सक्रिय होती. ही टीम दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सक्रिय राहते. मोबाईल आणि सोन साखळी हिसकावण्याच्या सात घटना पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यापैकी सहा प्रकरणांमध्ये पोलिसांनी एकूण १२ आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे दोन प्रकरणांमध्ये मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गर्दीतून सोन साखळी हिसकावून पसार होणाऱ्या टोळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी गणेश विसर्जनावेळी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा गर्दीच्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहताना त्यांचे मोबाईल फोन, दागिने आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 5:56 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Lalbaugcha Raja: लालबाग राजाच्या विसर्जनाला उशीर, गणेशभक्तांना पडलं महागात, पोलीसही अवाक्