संजूला डच्चू, गिल ओपनर... आशिया कपच्या पहिल्या सामन्यात कुणाला संधी? ड्रेसिंग रूममधून आली 11 जणांची लिस्ट!

Last Updated:
आशिया कपमध्ये टीम इंडिया पहिला सामना बुधवार 10 सप्टेंबरला खेळणार आहे. युएईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसन आणि रिंकू सिंग यांना टीममध्ये स्थान मिळणार नसण्याची शक्यता आहे.
1/11
मागच्या काही काळापासून संजू सॅमसनने टी-20 मध्ये टीम इंडियाकडून खेळताना धमाकेदार कामगिरी केली, पण आशिया कपच्या पहिल्या सामन्यात त्याला बाहेर बसावं लागू शकतं. शुभमन गिलची टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे, तसंच तो मागच्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

advertisement
2/11
शुभमन गिलसोबत दुसरा ओपनर म्हणून अभिषेक शर्मा खेळेल. डावखुरा आक्रमक बॅटर असलेला अभिषेक शर्मा सध्याच्या आयसीसी टी-20 क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय अभिषेक शर्मा टीमला बॉलिंगचा पर्यायही देतो.

3/11
तिलक वर्माने मागच्या दोन वर्षात तिसऱ्या क्रमांकावरचं स्वत:चं स्थान पक्कं केलं आहे. आयपीएल 2025 मध्ये तिलक वर्माची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती, पण तरीही टीम इंडिया तिलक वर्मावरच तिसऱ्या क्रमांकासाठी विश्वास दाखवण्याची शक्यता आहे.

4/11
सूर्यकुमार यादव हा टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या बॅटिंगचा कणा आहे. चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करताना सूर्यकुमार यादव एकहाती मॅच फिरवू शकतो. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वामध्येच टीम इंडिया आशिया कप खेळणार आहे.

5/11
2024 टी-20 वर्ल्ड कप विजयात अक्षर पटेलने मोलाची भूमिका बजावली. तसंच त्याने पाचव्या क्रमांकावरचं त्याचं स्थानही निश्चित केलं. 71 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अक्षर पटेलने 535 रन केले आणि 71 विकेट घेतल्या.

6/11
हार्दिक पांड्यावर बॅटिंगमध्ये फिनिशर तसंच तिसरा फास्ट बॉलर म्हणून जबाबदारी असेल. हार्दिकने 114 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1812 रन केल्या असून 94 विकेटही घेतल्या आहेत.

7/11
गिलमुळे संजू सॅमसनला बाहेर बसावं लागलं, तर जितेश शर्मा विकेट कीपर म्हणून खेळेल. जितेशने भारताकडून फक्त 9 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच खेळल्या आहेत, पण यंदाच्या आयपीएलमध्ये जितेशने धमाका केला. 176.35 च्या स्ट्राईक रेटने 261 रन केले.

8/11
कुलदीप यादव हा आशिया कपमध्ये टीम इंडियाचा एक्स फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे. आयपीएलनंतर कुलदीप यादव एकही सामना खेळलेला नाही, त्यामुळे तो मैदानात उतरण्यासाठी तयार असेल.

9/11
अर्शदीप सिंग हा टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये टीम इंडियाचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. भारताला टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकवण्यात अर्शदीपने महत्त्वाची भूमिका बजावली. सुरूवातीला नवीन बॉल स्विंग करण्यात आणि शेवटच्या ओव्हरमध्ये यॉर्कर टाकण्यात अर्शदीप माहीर आहे.

10/11
जसप्रीत बुमराह हा आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या बॉलिंग आक्रमणाचं नेतृत्व करेल. जगातला सर्वोत्तम टी-20 बॉलर असलेला बुमराह कशी कामगिरी करतो? यावर टीम इंडियाचं आशिया कपमधील भवितव्य अवलंबून असणार आहे.

11/11
युएईच्या खेळपट्टी या संथ आणि स्पिन बॉलिंगला अनुकूल आहेत, त्यामुळे मिस्ट्री स्पिनर असलेला वरुण चक्रवर्ती टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड ठरू शकतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement