Apple iPhone 17 उद्या होतोय लॉन्च! पहिल्यांदाच मिळतील हे फीचर्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Apple ने आधीच पुष्टी केली आहे की, नवीन आयफोन 9 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या लाँच केले जातील. त्यांची नावे iPhone 17, iPhone 17 Air, 17 Pro, 17 Pro Max अशी असतील. यावेळी कंपनी सर्व हँडसेटमध्ये 120Hz डिस्प्ले देईल. पहिल्यांदाच कंपनी 24MP सेल्फी कॅमेरा, 48MP TelePhoto कॅमेरा देणार आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
iPhone 17 ची किंमत : iPhone 17 हा सुरुवातीचा व्हेरिएंट असेल. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यावेळी कंपनी किंमत वाढवू शकते. गेल्या वर्षी लाँच झालेल्या iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 799 अमेरिकन डॉलर होती. भारतात त्याची किंमत 79,990 रुपये होती. आता iPhone 17 ची किंमत किती असेल, त्याची अधिकृत माहिती उद्या उघड होईल.
advertisement
advertisement