KDMC 27 Villages News : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, २७ गावांनी घेतलाय मोठा निर्णय
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
KDMC 27 Villages News : 27 गावांना कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये राहायचे नाही. यासाठी त्या 27 गावांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivli Municipal Corporation- KDMC) मधील 27 गावांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या गावांच्या भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्या 27 गावांना महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये राहायचे नाही. त्या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी आणि मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये याचिकेला अनेक दिवसांपासून दिलेली स्थगिती उठवावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी दाखल करून घेतली आहे.
त्या 27 गावांना महापालिकेतून वगळण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. जोपर्यंत त्या गावांचा निर्णय होत नाही, तोपर्यंत 27 गावांमध्ये निवडणूका घेऊ नका, अशी मागणी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने सर्वोच्च न्यायालयामध्ये केली आहे. त्यामुळे केडीएमसीच्या आगामी निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या याचिकेवर थेट 7 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, 27 गावांना महापालिकेतून बाहेर पडून स्वतंत्र महापालिका हवी आहे.
advertisement
27 पैकी 18 गावे वगळण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती रद्द करावी, अशी मागणीही समितीने केली आहे. महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर, केवळ 27 गावांतूनच 3500 पेक्षा जास्त हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. या हरकतींमधूनही 27 गावांना महापालिकेतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. संरक्षण समितीने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 7 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या पुढाकाराने समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
advertisement
1983 साली महापालिकेची स्थापना झाली तेव्हापासून ही गावं महापालिकेतच आहेत. मागील आघाडी सरकारने 2002 साली ही 27 गावं महानग पालिकेतून वगळली. 2015 मध्ये पुन्हा एकदा ही गावे महापालिकेत समाविष्ट केली. परत एकदा ही गावे महापालिकेतून वगळण्याच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक होते. महाविकास आघाडी सरकारने 27 गावांपैकी 18 गावे वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली. समितीचे सहसचिव सुमित वझे यांनी सांगितले की, 27 गावांच्या विकास आणि कल्याणासाठी समिती 42 वर्षांपासून लढा देत आहे. महापालिकेतून 27 गावांना वेगळे व्हायचे आहे. वेगळे होण्याचा लढा समितीचे नेते स्व. दि.बा.पाटील आणि रतन म्हात्रे यांनी दिला.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 08, 2025 4:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC 27 Villages News : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, २७ गावांनी घेतलाय मोठा निर्णय