Crime News : जुना भांडणातून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने आणि सिमेंटच्या गट्ट्यांनी हल्ला करण्यात आलेला आहे. या घटनेतील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिस तपास सुरू आहे.
पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून पिंपरीतील एका १७ वर्षीय मुलावर प्राणघातक हल्ला झाला. कोयता आणि सिमेंटच्या गट्ट्यांनी झालेल्या हल्ल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झालेला आहे. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
News18
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील काळेवाडी भागात शुक्रवारी, दि. 7 नोव्हेंबर रात्री ही घटना घडली. जिथे पीडित मुलगा आणि त्याचा मित्र घरी जात होते. त्याच वेळी पीडित मुलगा यांच्यावर त्याच्या ओळखीतील एका तरुणाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. दोघांवर झालेला हा हल्ला नवरात्रीच्या दिवसात झालेल्या जुन्या वादातून केला गेला असल्याचे समोर आले आहे.
advertisement
'ती' रात्र ठरली जीवघेणी
घटनेनुसार, आरोपीने लोखंडी कोयता काढून आधी पीडित मुलाच्या डोक्यावर प्राणघातक वार केला. या धक्कादायक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. यावर आरोपीन थांबता त्याच्या सोबत असलेल्यांनी सिमेंटचे गट्टू उचलून त्याच्या डोक्यात, तोंडावर जोरजोरात मारले, ज्यामुळे जखमा अधिक गंभीर झाल्या. याचवेळी, पीडित मुलाच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली.
advertisement
काळेवाडी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहचून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. सध्या पीडीत मुलगा रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही घटना तरुणांमध्ये वाढती हिंसा, जुन्या भांडणाचा राग आणि अगदी प्राणघातक हल्ल्यापर्यंत पोहोचणारी परिस्थिती यावर गंभीर प्रश्न उपस्थित करते.
प्रशासनाने हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. मात्र, स्थानिक लोक आणि पालक अजूनही चिंतेत आहेत, कारण असा प्रकार पुन्हा तरी पुन्हा घडू नये अशा मागणी होत आहे.