हडपसर टर्मिनलला आता पुणे रेल्वे स्थानकाचा पर्यायी ठिकाण म्हणून विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणची 90 टक्के कामे पूर्ण झाली असून, येथे नियमित आणि विशेष मिळून 12 गाड्या सुटणार आहेत. याशिवाय, 10 गाड्यांना येथे थांबा देखील देण्यात आला आहे. पुणे स्थानकाच्या रिमॉडेलिंग आणि विकासाच्या कामांमुळे काही गाड्या आता हडपसर आणि खडकी या स्थानकांवर वळवण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.
advertisement
अनोख्या तंत्रज्ञानाने पुणे स्टेशन सज्ज, गुन्हेगारांची ओळख एका क्षणात होणार, हे आता कसं शक्य?
रेल्वे प्रशासनाने आता काही गाड्यांचे प्रस्थान पुणे स्थानकाऐवजी हडपसर टर्मिनलवरून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दररोज सुटणाऱ्या 17629/17630 हडपसर – हजूरसाहिब नांदेड हडपसर एक्स्प्रेस आणि 01487/01488 हडपसर – हरंगुळ दैनंदिन विशेष गाड्या समाविष्ट आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतूक सुरळीत चालण्यासाठी हा बदल करण्यात आला असून, रेल्वे प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली आहे.






