अनोख्या तंत्रज्ञानाने पुणे स्टेशन सज्ज, गुन्हेगारांची ओळख एका क्षणात होणार, हे आता कसं शक्य?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा आता आणखी मजबूत होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत मध्य रेल्वे प्रशासनाने तब्बल 160 अत्याधुनिक एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थापना केली आहे.
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा आता आणखी मजबूत होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत मध्य रेल्वे प्रशासनाने तब्बल 160 अत्याधुनिक एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थापना केली आहे. चालू महिन्याअखेरपर्यंत ही संपूर्ण प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून, सध्या असलेले जुने 75 कॅमेरे टप्प्याटप्प्याने हटवले जातील. नवीन यंत्रणा केवळ निरीक्षणापुरती मर्यादित नसून, गुन्हेगारी रोखण्याचे शक्तिशाली साधन ठरणार आहे.
दिल्लीतील अलीकडील बॉम्बस्फोटानंतर देशभरातील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाले असताना पुणे स्थानकाची सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज होती. अशा परिस्थितीत हे एआय कॅमेरे रेल्वे पोलिसांसाठी रिअल-टाइम मदतनीस ठरणार आहेत. या कॅमेऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची फेस रेकग्निशन क्षमता. पोलिसांच्या डेटाबेसमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार अथवा संशयित व्यक्ती स्थानक परिसरात दाखल होताच यंत्रणा सक्रिय होईल आणि नियंत्रण कक्षाला तत्काळ अलर्ट पाठवेल.
advertisement
अलर्टमध्ये त्या व्यक्तीचे चित्र, ओळख तपशील आणि त्या क्षणी ती कुठे उभी आहे याची अचूक माहिती असेल. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहोचून त्वरीत कारवाई करता येणार आहे. गर्दीच्या वेळेत किंवा प्लॅटफॉर्मवर वाढलेल्या हालचालीदरम्यानही एआय कॅमेऱ्यांची अचूकता टिकून राहील, असा दावा रेल्वे विभागाने केला आहे.
advertisement
नवीन प्रणालीची वैशिष्ट्ये
नाईट व्हिजन क्षमता: रात्री किंवा कमी प्रकाशातही स्पष्ट दृश्य
फोर-के (4K) क्वालिटी: उच्च स्पष्टतेचे रेकॉर्डिंग
एआय-आधारित विश्लेषण: संशयास्पद हालचाली, गर्दीतील अनियमितता ओळखण्याची क्षमता
फेस रेकग्निशन सिस्टम: गुन्हेगार ओळखून त्वरित अलर्ट
कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले असून त्यांना प्रणालीशी जोडण्याचे अंतिम टप्प्याचे कार्य सुरू आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), मध्य रेल्वे, पुणे विभाग यांनी सांगितले की, चालू महिनाअखेरपर्यंत ही सुविधा सुरू करण्यात येईल. यामुळे प्रवाशांची सुरक्षा दुपटीने वाढेल, असा आम्हाला विश्वास आहे.
advertisement
पुणे रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. इतक्या मोठ्या वाहतुकीत गुन्हेगारांना शोधणे किंवा अनियमित हालचालींची तपासणी करणे कठीण असते. या नवीन प्रणालीमुळे केवळ गुन्हे रोखले जाणार नाहीत, तर आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना अधिक तत्परतेने प्रतिसाद देता येईल.या तांत्रिक बदलामुळे पुणे स्थानक देशातील सर्वात सुरक्षित रेल्वे टर्मिनल्सपैकी एक बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 17, 2025 8:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
अनोख्या तंत्रज्ञानाने पुणे स्टेशन सज्ज, गुन्हेगारांची ओळख एका क्षणात होणार, हे आता कसं शक्य?


