Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट, साताऱ्यात पारा 11 अंश सेल्सिअस, हवामान खात्याकडून अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
राज्यात थंडीची लाट कायम असून, पहाटे धुके आणि दव पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाची पुढील 24 तासांत स्थिती कशी राहील पाहुयात.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह असल्याने राज्याला कापरे भरले आहे. राज्यात थंडीची लाट कायम असून, पहाटे धुके आणि दव पडत आहे. आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे. उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाची पुढील 24 तासांत स्थिती कशी राहील पाहुयात.
advertisement
advertisement
advertisement
कोल्हापूरमध्ये देखिल गारठा वाढत असून दिवसाची सुरुवात साधारण 15 अंश सेल्सिअसच्या किमान तापमानाने होवून, जसजसा दिवस पुढे जाईल तसतसे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. सकाळी दाट धुक्यासह पडलेल्या थंडिचा गारवा दिवसभर टिकून राहिल. दुपारी उन्हाचा चटका वाढला तरी सुर्य घसरटिला लागताच पुन्हा वातावरणातील गारठा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. मात्र थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. किमान तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली घसरताच, थंडीचा कडाका वाढला आहे. तर कमाल तापमानातही हळूहळू घट होत असली तरी तुरळक ठिकाणी पारा अद्यापही तिजीपार आहे. पहाटे जाणवणारी हुडहुडी सकाळी उशिरापर्यंत टिकून राहत आहे.


