Pimpri Crime : कॉल उचलला नाही म्हणून पती संतापला; घरी येत पत्नीवर केलेल्या भयावह कृत्याने पिंपरी हादरली
Last Updated:
Shocking Crime News : पिंपरीत धक्कादायक प्रकार घडला असून कॉल न उचलल्याचा राग येऊन पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.
पिंपरी : लग्न म्हटलं की बऱ्याचदा क्षु्ल्लक कारणावरुन नवरा-बायकोमध्ये खटके उडतात. पण, अनेकदा हे वाद शांत ही होतात. मात्र पिंपरीत जी घटना घडली आहे ती ऐकल्यानंतर प्रत्येकजण हादरुन गेलेला आहे. एका पतीने अतिशय साधारण कारणावरुन पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्वत्र चर्चेत असलेली ही घटना पिंपरीतील तळेगाव दाभाडे परिसरातील आहे. या परिसरात पीडीत महिला राजश्री आणि संतोष असे पती-पत्नी राहण्यास आहेत.
पतीची पत्नीला अमानवी मारहाण
घटनेदिवशी संतोष ने राजश्रीला कॉल केला होता.मात्र तिने तो उचलला नाही. या अतिशय लहान गोष्टींचा संतोषला प्रचंड राग आला आणि त्याने घरी येऊन तिला रागाच्या भरात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ऐवढेच नव्हे तर पोटावर बुटाने मारले. धक्कादायक म्हणजे तिच्या गळ्यावर पाय ठेवून तिला जीव घेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
राजश्रीला झालेल्या मारहाणीत ती गंभीर जखमी झालेली असून त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. मग तळेगाव दाभाडे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाणून संतोषला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोद्धात गुन्हा दाखल केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 8:37 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Crime : कॉल उचलला नाही म्हणून पती संतापला; घरी येत पत्नीवर केलेल्या भयावह कृत्याने पिंपरी हादरली


