नियमितपणे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन
2018 सालापासून स्वर्गीय राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित केली जात आहेत. या शिबिरांत शेकडो लोकांच्या आरोग्य तपासण्या झाल्या असून, अनेक नागरिकांची ऑपरेशन्स विनामूल्य करण्यात आली आहेत.
Health Tips: शरीराला अति घाम येतोय? हे करा उपाय, लगेच मिळतील फायदे
advertisement
शिबिरांमध्ये नेत्रबिंदू तपासणी आणि संबंधित सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. यासोबतच बीपी, शुगर तपासणी आणि ज्येष्ठ नागरिकांना चष्मे वाटप देखील मोफत केले जाते. आरोग्य तपासणीसह आवश्यक औषधे व ऑपरेशन्सदेखील विनामूल्य उपलब्ध असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे कॅन्सर तपासणीदेखील केली जाते. जर एखाद्या व्यक्तीस कॅन्सर आढळला, तर त्यावरील उपचार, औषधांचा खर्च आणि ऑपरेशनसह संपूर्ण खर्च संस्थेतर्फे केला जातो.
या आरोग्य शिबिरांना समता फाउंडेशन मुंबई, देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांचेही सहकार्य मिळते. आतापर्यंत अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.
सामाजिक उपक्रमांतही पुढाकार
संस्थेचे संस्थापक विठ्ठलराव वरुडे पाटील हे आरोग्य शिबिरांबरोबरच अनेक सामाजिक कामांत सक्रिय आहेत. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेले माय माऊली हे वृद्धाश्रम वडीलधाऱ्या नागरिकांसाठी आधारस्थान ठरले आहे. येथे अनेक ज्येष्ठांचा विनामूल्य सांभाळ केला जातो.