TRENDING:

Pune: आई-भावाच्या डोळ्यात मिरची फेकली, तरुणीचं भर रस्त्यावरून केलं अपहरण, पुण्यातील धक्कादायक घटना

Last Updated:

दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली परिसरात ही घटना घडली आहे. भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

पुणे :  पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यात भरदिवसा एकाा २१ वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अज्ञात तरुणांनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकून अपहरण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली परिसरात ही घटना घडली आहे. भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 21 वर्षीय तरुणी आपल्या दुचााकीवरून चालली होती, त्यावेळी दोन तरुण तिथे आले आणि त्यांनी आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकून अपहरण केलं.

advertisement

अपहरण झालेली तरुणी ही आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी आरोपी जहीर शेख आणि अयान शेख या दोन आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. काही कळायच्या आत आरोपींनी अपहरण झालेल्या तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल चटणी फेकली, ज्यामुळे त्यांना काहीही दिसणे अशक्य झाले. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी २१ वर्षीय तरुणीचं अपहरण केले आणि तिथून पळ काढला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तुरीच्या दरात झाली मोठी वाढ, सोयाबीनला काय मिळाला दर?
सर्व पहा

तरुणीच्या आई आणि भावाने आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिकांनी दोघांची मदत केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. अपहरण झालेल्या तरुणीच्या आई आणि भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी  संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. तपासकामी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. ​टोल नाके आणि मुख्य रस्त्यांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे.  याप्रकरणी हिंदू संघटना आक्रमक झालेत त्यांनी भिगवण पोलीस स्टेशन समोर येते गर्दी केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune: आई-भावाच्या डोळ्यात मिरची फेकली, तरुणीचं भर रस्त्यावरून केलं अपहरण, पुण्यातील धक्कादायक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल