खेळता खेळता धावून आला काळ
प्रियंका मनोज विश्वकर्मा वय ३ वर्षे ९ महिने असे मृत मुलीचे नाव आहे. प्रियंका ही आपल्या घराबाहेर खेळत असताना जवळच बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या परिसरात गेली. तिथे पाण्याची टाकी उघडी होती, ज्यावर कोणतेही झाकण किंवा सुरक्षिततेचे उपाय नव्हते. खेळण्याच्या नादात प्रियंका या टाकीत पडली आणि तिचा बुडून मृत्यू झाला.
advertisement
याप्रकरणी प्रियंकाचे वडील मनोज उज्जैन विश्वकर्मा यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत मनीष बाबासाहेब पवार, जयराम बबनराव कांबळे आणि वसंत कैलास बनसोडे या तिघांना अटक केली आहे.
निष्काळजीपणा नडला
तपासात असे समोर आले आहे की, संबंधित ठिकाणी पाण्याची टाकी उघडी असल्यामुळे अपघात होऊ शकतो आणि जीवितहानी होऊ शकते, याची पूर्ण कल्पना संशयितांना होती. असे असूनही त्यांनी टाकीवर झाकण लावण्याची तसदी घेतली नाही. या गंभीर निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप बालिकेचा बळी गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
