श्रावण महिना सुरू होताच देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी एस टी महामंडळाकडून यावर्षीही 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान विशेष दर्शन यात्रेचे आयोजन केले गेले आहे. यात महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सूट असणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना ही सवलतीच्या दरात प्रवास करता येईल. विशेष म्हणजे प्रवासादरम्यान चहा, नाश्ता, जेवण आणि निवासाची देखील व्यवस्था असणार आहे.
advertisement
Maghi Ganpati: तब्बल 5 महिन्यांनी होणार बाप्पाचं विसर्जन! हायकोर्टाच्या निकालाने सुटला ‘तो’ पेच
एस टी महामंडळाच्या विशेष सुविधेमुळे भाविकांना गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर, श्रीक्षेत्र देहू-अळंदी, अंबाजोगाई, नसराबाईची (नरसोबाची) वाडी, गोळवडले, शिरवळ, शिंगणापूर, खिद्रापूर आदी देवस्थानांना जाता येणार आहे.
यात्रेसाठी निम आराम आणि साधी बस
सर्व विशेष गाड्या स्वारगेट आगारातून सोडण्यात येणार असून, प्रवाशांसाठी आरक्षणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. यामध्ये नीम आराम आणि साध्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना सुरक्षित प्रवास अनुभवता यावा यासाठी गाड्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
यात्रा विशेष बस गाड्यांचे वेळापत्रक
अष्टविनायक दर्शन: 13 व 16 ऑगस्ट
गोंदवले, शिरवळ, शिखर शिंगणापूर: 15 ऑगस्ट
आदामपूर, खिद्रापूर, नरसोबाची वाडी: 16 व 17 ऑगस्ट
गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर: 9 व 17 ऑगस्ट
गणपतीपुळे, देवळा, पावन मंदिर: 18 ते 20 ऑगस्ट
तुळजापूर, महूरगड, रेणुका माता (साडेतीन शक्तीपीठे): 18 ते 21 ऑगस्ट
