आज राज्यातील राजकारणात अमित शाहांची शरद पवारांवरील टीका आणि अजित पवार या दोन घटनांची मोठी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत आज पुण्यात भाजपाचा मेळावा पार पडला, यावेळी शाहांनी मराठा आरक्षणावरून पवारांवर टीका केली होती. "भारतातील भ्रष्टाचाराचे सरदार शरद पवार आहेत," असं अमित शाह म्हणाले होते. शाहांच्या या टीकेवर अजित पवारांना माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता अजित दादांनी उत्तर देणं टाळलंय, नेमकं काय घडतंय? जाणून घेऊयात
advertisement
शरद पवारांवर अमित शहांची टीका:
पुण्यात आज विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा राज्यव्यापी मेळावा पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवारांवर टीकेची तोफ डागली. शरद पवारांना मराठा आरक्षण आणि इतर अनेक मुद्दयांवर धारेवर धरलं. "महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे खरे सरदार खुद्द शरद पवार आहेत, पवारांमुळेचं राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिला. शरद पवारांमुळे राज्यात भाजपाने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द झालं." अशी जहरी टीका शाहांनी केली होती.
अजित पवारांची काय प्रतिक्रिया:
दरम्यान एकीकडे महायुतीमध्ये अजित पवार स्वबळावर लढतील अशा चर्चा सुरू आहेत. असं असताना अजित पवारांच्या परतीच्या चर्चाही मधून घडतात. शरद पवारांवरील अमित शाहांच्या टीकेबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता दादांनी दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. "अमित शाह नेमकं काय बोलले ते मला माहित नाही. मात्र मी नेमकी टीका काय केली ती पाहून प्रतिक्रिया देईन" असं सावध उत्तर अजितदादांनी दिलं आहे.
दादांच्या 'त्या' विधानाची चर्चा:
काल पुण्यात डिपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांचा अपमान केला का, अशी चर्चा सुरू होती. त्यावर दादांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. "शरद पवार हे माझं दैवत आहेत. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. त्यांचा अपमान केला म्हणून काहीजण नेरिटीव्ह सेट करत आहेत, "असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य खोडून काढलं आहे. अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक काल पुण्यात पार पडली. निधी वाटपावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या आमदाराला धारेवर धरलं होतं. यावरून हे राजकारण पेटलेलं होतं. अखेर यावर अजित पवारांनी स्वतः उत्तर दिलं आहे.
Maharashtra Politics: 'शरद पवारांचं सरकार...', अमित शाह यांच्या आरोपांवर जयंत पाटलांचा पलटवार
