TRENDING:

इंजिनिअरिंग सोडली अन् आज 35 देश पोहोचलं नाव, धाराशिवच्या तरुणाची कहाणी

Last Updated:

पुण्यात इंजिनिअरिंगच शिक्षण घेत असलेल्या एका तरुणाने शिक्षण सोडून वेगळा मार्ग निवडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 28 ऑक्टोबर : शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळावावी असं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. यासाठी तरुण धडपड करत असतात. मात्र पुण्यात इंजिनिअरिंगच शिक्षण घेत असलेल्या एका तरुणाने शिक्षण सोडून वेगळा मार्ग निवडला आहे. त्याने पुस्तकांचा व्यवसाय सुरु केला आहे. 100 पुस्तक घेऊन केलेला त्याचा हा व्यवसाय आज 5 हजार पुस्तकापर्यंत पोचला आहे. आता पर्यंत जवळजवळ 35 देशामध्ये त्याने पुस्तक पोहोचवली आहेत. कोण आहे हा तरुण? कसा झाला त्याचा इथं पर्यंतचा प्रवास जाणून घेऊया.
advertisement

कसा झाला इथं पर्यंतचा प्रवास

धाराशिव जिल्ह्यातील कणगारा गावामधील या तरुणाचं नाव अविनाश इंगळे आहे. त्याचे पुण्यात भाई अविनाश इंगळे बुक गॅलरी या नावाने दुकान आहे. अविनाशचे 12 वी पर्यंत शिक्षण ग्रामीण भागात झालं. त्यानंतर तो पुढील शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आला. 'मी मध्येच 2014 मध्ये इंजिनिअरिंग सोडून गावी गेलो. त्यामुळे घरी जी परिस्थिती होती ती फार तणावाची होती. त्यामुळे काही तरी नवीन करायचं म्हणून पुणे गाठलं 2017 मध्ये पुण्यात आल्यानंतर नोकरी नव्हती आणि राहण्याची सोय नव्हती. त्याकाळामध्ये मित्रानी मला खूप मदत केली', असं अविनाश इंगळे सांगतो.

advertisement

आईच्या नावाने असा तयार केला ब्रँड की भलेभले पडले मागे, कोट्यवधींची कंपनी उभारणाऱ्या मराठी तरुणाची कहाणी

चळवळीतून पुस्तकाकडे प्रवास जाणारा प्रवास

'मी सामाजिक चळवळी आंदोलनामध्ये सक्रिय होतो. गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर आंदोलनाला जायचो दाभोळकरांच्या हत्येने अधिक अस्वस्थ झालो. त्यानंतर ठरवलं की आपल्याला काही तरी करायचं त्या परिस्थितीत एक मार्ग सापडला तो म्हणजे प्रोग्रॅसिव्ह साहित्य घेऊन सुरु करायचं. सुरुवातीला हरिती प्रकाशनाला संपर्क केला 20 टायटल आणि 100 पुस्तक असतील. ती घेऊन जागोजागी स्टॉल लावायला सुरुवात केली.

advertisement

15 रुपयांत भरपेट नाश्ता, कोल्हापुरातील ही प्रसिद्ध ठिकाणे माहितीयेत का?

त्यादरम्यान एक गोष्ट घडली की एस एम हशीन मुश्रीफ यांचा कार्यक्रम झाला. इथं स्टॉल लावून आलेल्या पैशाततून काही नवीन पुस्तक घेतली. मग आप्पा बळवंत चौकात एक गाळा घेऊन दुकान सुरु केलं. पण हे करत असताना एक पुस्तकं घेऊन त्याची समीक्षा लिहिण्यास सुरुवात केली. ती सोशल मीडियावर टाकायला लागलो. लोकांचा प्रतिसाद चांगला आला. मग लेखावर काम करायला सुरुवात केली', असं अविनाश इंगळे सांगतो.

advertisement

कुठल्या देशात पोचवली पुस्तके

'आज देशात जवळ सर्व राज्यामध्ये पुस्तके पोहचली आहेत.महाराष्ट्रातील 353 तालुक्यात ग्राहक आहेत. 35 देशामध्ये आंतरराष्ट्रीय ऑर्डर आल्यामुळे मराठी पुस्तक पाठवली आहेत. सुरुवात केली तेव्हा 100 पुस्तक होती. परंतु आता 5 हजार पेक्षा जास्त पुस्तक आहेत', असं अविनाश इंगळे सांगतो.

मराठी बातम्या/पुणे/
इंजिनिअरिंग सोडली अन् आज 35 देश पोहोचलं नाव, धाराशिवच्या तरुणाची कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल