मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी आता आंदेकर टोळीवर कारवाईचा धडाका लावला आहे. आंदेकर टोळीने आयुष कोमकरची गणेशोत्सवाच्या काळात गोळ्या झाडून खून केला होता. ऐन गणेशोत्सवात झालेल्या या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले होते. या प्रकरणी बंडू आंदेकरसह एकूण 16 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीची रसदच बंद करण्याचा धडाका पोलिसांनी लावला आहे.
advertisement
आंदेकर टोळीची एकूण ३७ बँक खाती असल्याचं समोर आलं. वेगवेगळ्या बँकांमध्ये एकूण १ कोटी ४७ लाख रुपये जमा होते. पोलिसांनी ही रक्कम गोठवली आहे. एवढंच नाहीतर बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबीयांचीही मालमत्ता खोदून काढली आहे. आंदेकर कुटुंबाकडे एकूण १७ कोटी ९८ लाखांची मालमत्ता पोलिसांनी शोधून काढली.
आंदेकर कुटुंबाकडे मोठी संपत्ती उघड झाली आहे. बंडू आंदेकरच्या नावावर फुरसुंगी इथं २४.५ गुंठे जागा आहे. कोथरूमध्ये २ फ्लॅट, २ दुकानं आणि एक ३ मजली घर आहे. एवढंच नाहीतर नाना पेठेत एक फ्लॅट, लोहियानगर आणि हडपसरमध्ये खोल्या असल्याचं समोर आलंय. चर मुलगी वृंदावनी वाडेकरच्या नावावर ३ मजली घर, एक टपरी आणि साईनाथ वसाहतीत एक खोली आहे. शिवम आंदेकरच्या नावावर मुळशीमध्ये आगळांबे गावात २२ गुंढे जागा, कोथरूड आणि नाना पेठेत २ फ्लॅट आणि दुकान आहे. शिवराज आणि सोनाली आंदेकरकडे सुद्धा नाना पेठेत एक फ्लॅट आणि एक दुकान आहे. १६ असे करारनामे आंदेकर कुटुंबीयांशी संबंधित मालमत्तेची गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
आंदेकर टोळीची अनधिकृत बांधकाम पाडली
दरम्यान, चार दिवसांपूर्वी पोलिसांनी आंदेकर टोळीवर सर्वात मोठी कारवाई केली. पुण्याच्या नाना पेठेत आंदेकर टोळीकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं होतं. हेच बांधकाम आता तोडायला सुरुवात केली. या पाडकामासाठी पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांचं पथक नाना पेठेत धडकलं. संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली होती.