TRENDING:

Baramati : शाळेला निघाले होते विद्यार्थी, भरधाव कारने चिरडले; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Last Updated:

पुण्याहून बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या कारने विद्यार्थ्यांना धडक दिली. तिघांना कारने धडक दिली होती. यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जितेंद्र जाधव, बारामती, 04 सप्टेंबर : बारामतीत भरधाव कारने शाळकरी मुलांना चिरडल्याची भीषण दुर्घटना घडलीय. यात तीनपैकी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. बारामती तालुक्यातल्या कडेपठार गावात हा अपघात झाला. विद्यार्थी शाळेला जात असताना कारने त्यांना धडक दिली. या धडकेत दोन विद्यार्थी जागीच ठार झाले. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी शाळेत निघाले होते. तेव्हा पुण्याहून बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या कारने विद्यार्थ्यांना धडक दिली. तिघांना कारने धडक दिली होती. यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. ओंकार संतोष खांडेकर आणि रुपेश अमोल  खांडेकर अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी कार चालकाला ताब्यात घेतलं असून अधिक तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Baramati : शाळेला निघाले होते विद्यार्थी, भरधाव कारने चिरडले; दोघांचा मृत्यू, एक गंभीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल