मागील वर्षीय १५ जानेवारी रोजी घडलेल्या या संतापजनक घटनेत फिर्यादी आपल्या अल्पवयीन बहिणीची छेडछाड केल्याबाबत आरोपीला जाब विचारण्यासाठी विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात गेला होता. यावेळी आरोपींनी त्याच्यावर हातातील लोखंडी कडे आणि धारदार कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौरव दिलीप टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी, पणधरे, ता. बारामती, जि. पुणे) हा गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीमने गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी परिसरातून आरोपीस अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही भिगवण पोलीस ठाणे, बारामती तालुका पोलीस ठाणे आणि बारामती शहर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. असा हा सराईत गुन्हेगार विद्या प्रतिष्ठान सारख्या कॉलेजमध्ये घुसून मुलींची छेड काढत होता. त्याला जाब विचारलं असता त्याने मुलीच्या भावावर कोयत्याने वार केले होते.
