TRENDING:

Bhigwan: माझे अपहरण नाही, त्याच्याशी प्रेमसंबंधच; भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, मुलीच्या कबुलीचा Video

Last Updated:

या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून तरूणीने एक व्हिडीओ करून माझे अपहरण झाले नसल्याची माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुमीत सोनावणे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोलीमधील 21 वर्षीय तरुणीचं भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपहरण झाल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणात मोठी अपडेच समोर येत असून तरूणीने एक व्हिडीओ करून माझे अपहरण झाले नसल्याची माहिती दिली आहे. ज्या तरूणावर माझ्या अपहरणाचा आरोप होतोय त्याच्यासोबत माझे प्रेमसंबध असल्याची कबुली मुलीने कॅमेऱ्यासमोर येत दिली आहे. माझ्या अपहरणाच्या बातम्या खोट्या असल्याचं देखील मुलीने स्पष्ट केले आहे.

advertisement

भिगवणच्या तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी जहीर शेख आणि अयान शेख या दोन आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली आणि तरूणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट टाकून अपहरण केलं. या घटनेनंतर भिगवण पोलीस ठाण्यासमोर हिंदू संघटनांची घोषणाबाजी केली हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदू संघटनांनी पुणे-सोलापूर मार्ग अडवून महामार्गावर टायर पेटवले. या आरोपींना पकडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. तर आज भिगवण बंदची हाक देण्यात आलीय. दरम्यान माझे अपहरण झालेच नाही असे म्हणत तरूणीने सांगितले आहे.

advertisement

होय माझे त्याच्याशी प्रेमसंबंध, मुलीचा कबुलीनामा

माझे आणि मुलाचे गेल्या काही वर्षापासून प्रेमसंबंध आहे. माझे अपहरण झाल्याच्या बातम्या आहेत. परंतु माझे कुणीही अपहरण केले नाही. माझ्या डोळ्यात चटणी वगैरे टाकलेली नाही. मी माझ्या मर्जीने घरातून निघून आले आहे. राजकीय पुढाऱ्यांनी तसे आरोप केले. परंतु मी माझ्या मर्जीनेच मुलासोबत आलेली आहे, असे भिगवण प्रकरणातील मुलीने स्पष्ट केले.

advertisement

हिंदू संघटना आक्रमक

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुणे-सोलापूर रस्ता येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भिगवण पोलीस स्टेशनसमोरही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले होते. घोषणाबाजी करत आरोपींना तत्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

advertisement

पोलिसांचे शांततेचे आवाहन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रासायनिक काजळामुळे डोळ्यांना धोका? वेळीच घ्या अशी काळजी, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, परिसरात कोणताही धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. "कोणीही अफवा पसरवू नये किंवा मोर्चे काढू नयेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Bhigwan: माझे अपहरण नाही, त्याच्याशी प्रेमसंबंधच; भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, मुलीच्या कबुलीचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल