नेमकी प्रक्रिया तरी काय?
ग्राहकांनी आपला गॅस पुरवठादार कंपनीचा अधिकृत व्हॉट्सअॅप नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावा. त्यानंतर त्या नंबरवर इंग्रजीत 'हाय' किंवा 'बुक' असा मेसेज पाठवला की कंपनीकडून लगेच ऑटो-रिप्लाय येतो. या ऑटो-रिप्लायमध्ये 'बुक सिलिंडर' किंवा 'रिफिल' अशा पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडता येतो. त्यानंतर ग्राहकांना आपली ग्राहक आयडी किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकण्याची सूचना मिळते. ही माहिती भरल्यानंतर बुकिंग प्रक्रिया पूर्ण होते आणि सिलिंडरची ऑर्डर नोंदवली जाते.
advertisement
या डिजिटल सुविधेमुळे गॅस ग्राहकांचा वेळ, धावपळ आणि पैशांची बचत होणार आहे. पूर्वी गॅस बुकिंगसाठी ग्राहकांना वारंवार फोन लावावा लागायचा किंवा एजन्सीच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन ऑर्डर नोंदवावी लागायची. मात्र, आता फक्त काही सेकंदात व्हॉट्सअॅपवरून बुकिंग शक्य झालं आहे. तसेच तक्रार नोंदवणे, ऑर्डरची माहिती घेणे, पेमेंटसंबंधी चौकशी करणे अशा इतर सेवाही व्हॉट्सअॅपवर सहज उपलब्ध आहेत.
एचपी गॅस वितरक पिंपरी यांनी सांगितलं की,ग्राहकांना जलद, सोप्या आणि आधुनिक सुविधा देणं हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. व्हॉट्सअॅपवरील या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या गॅस सिलिंडर मिळवणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे गॅस बुकिंगसाठी पूर्वी करावी लागणारी धावपळ आता संपली आहे. ही पद्धत वापरल्यास ग्राहकांना कोणताही त्रास न होता काही क्षणांत सिलिंडरची ऑर्डर करता येते. त्यामुळे वेळ व श्रम वाचून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.