कोणत्या दिवशी धावणार विशेष रेल्वे
ही विशेष ट्रेन मर्यादित कालावधीसाठी चालवली जाणार असून ती दिवाळीच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या मागणीची गरज भागवेल. ट्रेन क्रमांक 07607 "नांदेड-हडपसर विशेष" ही 21 आणि 28 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता नांदेड स्थानकावरून सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी रात्री 9.40 वाजता हडपसर (पुणे) येथे पोहोचेल.
advertisement
किती असतील थांबे...?
तर उलट दिशेची ट्रेन क्रमांक 07608 "हडपसर-नांदेड विशेष" त्याच दिवशी रात्री 10.50 वाजता हडपसरहून सुटेल. या दोन्ही ट्रेनमध्ये प्रवाशांना मर्यादित कालावधीसाठी प्रवासाची संधी मिळणार असून जागा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर दिल्या जातील.महत्त्वाचे म्हणजे यात विशेष रेल्वेची थांबे पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी शहर, कडूवाडी, दौंडमार्गे असे असतील.
मध्य रेल्वेने या विशेष ट्रेनची घोषणा करताना सांगितले की दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी परततात. त्यामुळे नियमित गाड्यांमध्ये गर्दी वाढते आणि अनेकांना जागा मिळणे कठीण होते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत.
या विशेष ट्रेनसाठी तिकीट दर थोडे अधिक असले तरी प्रवाशांना आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. प्रवाशांनी आपल्या तिकिटांची नोंदणी आधीच करावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ही विशेष सेवा मराठवाड्यातील प्रवाशांसाठी एक मोठी दिलासा देणारी बाब ठरत आहे, कारण या मार्गावर दिवाळीच्या काळात नेहमीच गर्दी वाढलेली असते. रेल्वेच्या या निर्णयामुळे हडपसर आणि नांदेड दरम्यान प्रवास अधिक सोपा आणि सुलभ होणार आहे.