नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चाकण येथील शनिमंदिराच्या पाठीमागे ही घटना घडली. फिर्यादी दयानंद माणिक सावंत (वय २५) हे घरात असताना, त्यांचा मोठा भाऊ किशोर माणिक सावंत (वय ३०) हा पोहे बनवण्यासाठी कांदा चिरत होता. दरम्यान, दारू पिण्याच्या सवयीवरून आणि काम न करण्याच्या कारणावरून दोघा भावांत शाब्दिक चकमक उडाली.
advertisement
वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात किशोरने हातात असलेला कांदा कापण्याचा चाकू दयानंदच्या डाव्या बरगडीवर खुपसला. या अचानक झालेल्या हल्ल्यात दयानंद गंभीर जखमी झाले. जखमी दयानंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी किशोर सावंत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपास अधिकारी बीएनएसएस कलम ३५ (३) नुसार आरोपीला नोटीस बजावून पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत. पोलीस हवालदार निघोट या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
भावाच्या हातूनच झालेला हा हल्ला पाहून परिसरातून खळबळ उडाली असून, घरगुती वादातून होणारी हिंसा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
