या पुतळ्याच्या उभारणीत सुरेश नाशिककर यांचे मोलाचे योगदान आहे. 1978 साली एका वर्तमानपत्रात आलेल्या लेखावरून त्यांचे लक्ष संभाजी महाराजांच्या चरित्राकडे वेधले गेले. ते केवळ युद्धात पराक्रमी नव्हते, तर एक विद्वान संस्कृत पंडित व धर्मरक्षक होते. मात्र, इतिहासात त्यांची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली होती. त्यामुळे ही प्रतिमा बदलण्यासाठी नाशिककर यांनी धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानची स्थापना केली.
advertisement
Maratha Tourism: शिवनेरी ते रायगड, किल्ल्यांना जोडणार मराठा पर्यटन ट्रेन, कधीपासून होणार सुरू?
काही वर्षांनी वर्गणी गोळा करून स्मारक समिती स्थापन करण्यात आली. शिल्पकार शोधून मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. साधारणतः सव्वा लाख रुपयांचा खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला. यासाठी प्रसिद्ध इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांचेही मार्गदर्शन लाभले.
हा पूर्णकृती पुतळा सुमारे 9 फूट उंच असून, त्याचे डोळे, हात, उभे राहण्याची शैली आणि पेहराव यामुळे तो अत्यंत प्रभावी दिसतो. समाजमनावर खोल परिणाम करणारा हा पुतळा तब्बल तीन वर्षांच्या मेहनतीनंतर साकारण्यात आला. संभाजी महाराजांची खरी ओळख समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मूर्ती एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे. आजही हा पुतळा प्रेरणास्थान ठरतो आणि त्यांच्या शौर्याचा साक्षीदार म्हणून उभा आहे.