TRENDING:

'साहेब, तो माझ्या मुलीला मारून टाकेल'; महिलेचा तो आकांत अन् पोलिसांची रात्रभर धावपळ; पहाटे हादरवणारं सत्य समोर

Last Updated:

"साहेब, वाचवा! तो माझ्या सहा वर्षांच्या मुलीला मारून टाकण्यासाठी घेऊन गेला आहे," असा टाहो फोडत एक महिला मध्यरात्री चिंचवड पोलीस ठाण्यात आली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी-चिंचवड: "साहेब, वाचवा! तो माझ्या सहा वर्षांच्या मुलीला मारून टाकण्यासाठी घेऊन गेला आहे," असा टाहो फोडत एक महिला मध्यरात्री चिंचवड पोलीस ठाण्यात आली. हा गंभीर प्रकार ऐकताच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या काळजाचा ठोका चुकला आणि एका चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लागलं. मात्र, रात्रभर धावपळ केल्यानंतर जेव्हा सत्य समोर आलं, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले.
महिलेची खोटी तक्रार (AI Image)
महिलेची खोटी तक्रार (AI Image)
advertisement

नेमकी काय होती घटना?

मंगळवारी (३ फेब्रुवारी) मध्यरात्रीनंतर एक महिला धावत पोलीस ठाण्यात आली. तिने पोलिसांना सांगितलं की, तिचा दुसरा पती मद्यपी असून तो तिला सतत मारहाण करतो. "आज त्याने मला धमकी दिली आहे की, एकतर तुला मारेन किंवा तुझ्या मुलीला (पहिल्या पतीपासून झालेली मुलगी) संपवून टाकेन. तो मुलीला घेऊन घराबाहेर पडला आहे," अशी माहिती तिने दिली.

advertisement

पोलिसांची थरारक मोहीम

सहा वर्षांच्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचे समजताच पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने तपासाची चक्रे फिरवली. रात्रभर पोलिसांची पथके शहराच्या कानाकोपऱ्यात मुलीचा शोध घेत होती.

सत्य समोर येताच संताप

अखेर पोलिसांनी त्या महिलेच्या घराची आणि परिसराची सखोल तपासणी केली. तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. ज्या मुलीच्या खुनाची भीती आईने व्यक्त केली होती, ती मुलगी चक्क तिच्या वडिलांसोबत घरात शांतपणे झोपलेली आढळली. अधिक चौकशी केल्यावर स्पष्ट झाले की, पती-पत्नीमधील भांडणातून पतीला अद्दल घडवण्यासाठी महिलेनं ही खोटी तक्रार केली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

महिलेच्या या एका खोट्या तक्रारीमुळे चिंचवड पोलिसांची रात्रभर विनाकारण धावपळ झाली. कौटुंबिक वादात कायद्याचा आणि पोलिसांचा असा चुकीचा वापर केल्याबद्दल आता संताप व्यक्त केला जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/
'साहेब, तो माझ्या मुलीला मारून टाकेल'; महिलेचा तो आकांत अन् पोलिसांची रात्रभर धावपळ; पहाटे हादरवणारं सत्य समोर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल