TRENDING:

पुणेकरांच्या खिशाला पुन्हा कात्री! CNG च्या दरात मोठी वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू, इराण-इस्रायल युद्धाचा फटका?

Last Updated:

गेल्या काही दिवसांत घरगुती गॅस आणि पेट्रोलच्या किमतीत झालेल्या चढ-उतारानंतर सीएनजी महागल्याने मध्यमवर्गीय पुणेकरांना याचा फटका बसणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणेकरांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे. पेट्रोल आणि एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर आता पुणेकरांना सीएनजीच्या (CNG) महागाईचा सामना करावा लागणार आहे. पुणे शहरात सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी वाहनधारकांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.
CNG च्या दरात मोठी वाढ (फाईल फोटो)
CNG च्या दरात मोठी वाढ (फाईल फोटो)
advertisement

सीएनजीचे नवे दर काय?

पुणे आणि परिसरात आता सीएनजीसाठी ग्राहकांना अधिक मोजावे लागणार आहेत. दरात आता 2 रूपयांची वाढ झाली असून नवा दर ९४.५० रुपये प्रति किलो असा असणार आहे.

दरवाढीचे मुख्य कारण काय?

सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन टंचाई जाणवू लागली आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे ही दरवाढ झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यात सीएनजीच्या किमती वाढल्यामुळे आता रिक्षा भाडेवाढीची मागणी देखील जोर धरण्याची शक्यता आहे.

advertisement

सामान्यांचे बजेट कोलमडले

गेल्या काही दिवसांत घरगुती गॅस आणि पेट्रोलच्या किमतीत झालेल्या चढ-उतारानंतर सीएनजी महागल्याने मध्यमवर्गीय पुणेकरांना याचा फटका बसणार आहे. 92.50 रुपये प्रति किलो मिळणारा सीएनजी आता 2 रुपयांनी महाग खरेदी करावा लागणार.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसाने घेतली पुणे पालिकेची 'परीक्षा', ढगफुटी की आणखी काही? महापौरांनी स्पष्ट सांगितलं!
सर्व पहा

पुण्यात सीएनजी महागलेला असतानाच, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOCL) देखील आपल्या प्रीमियम श्रेणीतील इंधनांच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. कंपनीने बुधवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू केली असून, सर्वाधिक शुद्ध मानले जाणारे 'XP100' (100-Octane) पेट्रोल आता प्रति लिटर तब्बल १६० रुपयांवर पोहोचले आहे. दिल्लीमध्ये या इंधनाचा दर पूर्वी १४९ रुपये होता, त्यात आता थेट ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. केवळ पेट्रोलच नव्हे, तर प्रीमियम श्रेणीतील 'एक्स्ट्रा ग्रीन' डिझेलचे दरही प्रति लिटर ९१.४९ रुपयांवरून वाढवून ९२.९९ रुपये करण्यात आले आहेत. आयओसीएलच्या सर्व अधिकृत विक्री केंद्रांवर हे नवीन दर लागू झाले असून, हाय-एंड गाड्या वापरणाऱ्या वाहनधारकांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांच्या खिशाला पुन्हा कात्री! CNG च्या दरात मोठी वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू, इराण-इस्रायल युद्धाचा फटका?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल