महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने CNG आणि घरगुती पाइपलाइन गॅस (PNG) चे नवीन दर जाहीर करण्यात आले. या दोन्हीच्या किंमती वाढवल्याने आता महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाढलेल्या किमती 8 जुलैच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 9 जुलै 2024 पासून लागू करण्यात आल्या आहेत.
दिल्लीनंतर मुंबईत सीएनजीच्या किमतीत 1.50 रुपये किलोने वाढ झाली. तर पाइप लाइन गॅसच्या (पीएनजी) किमतीत एक रुपयाने वाढ झाली आहे. प्रामुख्याने कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने दरात वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
सीएनजी आणि पीएनजीचे दर पेट्रोल डिझेल महाग होत असल्याने वाढत आहेत. इतकंच नाही तर घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने पाइपलाईन गॅस घेणं पसंत करतात. त्यामुळे दिवसेंदिवस ही मागणी वाढत आहे. आता वाढत्या मागणीमुळे जास्त खरेदी करावी लागत असल्याने किंमती वाढल्याचं सांगितलं जात आहे.
