याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिलीप गायकवाड असं गोळीबार झालेल्या वाळू व्यावसायिकाचं नाव आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास साळवे नगर परिसरात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दोन ते तीन हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याची माहिती समजते. हल्ल्यात दिलीप गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. तर गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समजताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी दोन ते तीन गोळ्या झाडल्या असल्याचं समजते. या प्रकरणी पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
advertisement
खानापूरमध्ये शनिवारी मध्यरात्री गोळीबाराची घटना
खडकवासला येथून दहा किलोमीटरवर असलेल्या खानापूर गावात पूर्व वैमनस्यातून शनिवारी मध्यरात्री दोन गटात गोळीबारची घटना घडली होती. यामध्ये, एक जण मयत झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिस्थिती पुन्हा आता बाहेर जाऊ नये म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांकडून गावात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे- पानशेत रस्त्यावरील बाजारपेठ असलेल्या या गावात शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास खानापूर ते सांबरेवाडी रस्त्यावर ही घटना घडल्याची माहिती मिळते.