प्राथमिक आणि माध्यमीक शिक्षकांचे पगार झाले नाही याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असताना त्यांनी थेट पत्रकारांसमोर फोन लावला आणि पगार झाले का झाले नाहीत याबाबत जाब विचारला.
आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा संसार मोडला? पत्नीचे फोटो डिलिट,अनफॉलो केले
पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. अशात शिक्षकांचे पगार झाले नाही या प्रश्नावर त्यांनी थेट संबंधित अधिकारी ओपी गुप्ता यांना फोन लावण्यात सांगितले. फोन लागेपर्यंत दादांनी अनेकदा बातम्यांमध्य तथ्य नसते आणि उगाच काही तरी चर्चा सुरू होता. मी आताच विचारतो, असे सांगत अधिकाऱ्याशी फोनवर बोलून घेतले. सर्व काम करणाऱ्या वर्गाचे पगार वेळत झाले पाहिजे त्यात विलंब होण्याचे काहीच कारण नाही. तरी देखील झाले नसतील तर का झाले नाही आणि कसे ताबडतोब होतील हे विचारतो असेही म्हणाले.
advertisement
हे कोडे सोडवा आणि 8.5 कोटींचे बक्षीस जिंका, 100 वर्षे उत्तर सापडले नाही
संबंधित अधिकाऱ्याशी फोनवर बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले- ACS फायनान्स सांगितले आहे की, सर्व विभागांना पगाराचे पैसे उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक विभागात पगार देत असताना त्यांच्या अंतर्गत त्रुटी असतील तो त्याच्यात झाला असेल. त्यामुळे पगार झाले नाहीत. त्यामुळे हा विषय क्लिअर झाला आहे की विभागाने पैसे दिले आहेत. आता शिक्षण सचिवांशी देखील बोलतो. अशा प्रकारे पगार अजिबात राहता कामा नये आणि राहणार नाहीत ही खबरदारी घेतो, असे अजित दादांनी स्पष्ट केले.