कोयता गँगकडून तरुणावर वार, कोयता गँगकडून सोसायटीत घुसून हल्ला अशा प्रकारच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यावर प्रश्न विचारले असता, अजित दादांनी स्पष्टपणे सांगितले की- हे प्रकार विशिष्ट दिवसात थांबेल नाही तर आम्हाला दुसरा अधिकारी इथे आणावा लागले अशा प्रकारची ताकीद दिल्याचे अजित पवारांनी सांगितले.
शिक्षकांचा पगार झाला नाही? दादांनी भर पत्रकार परिषदेत अधिकाऱ्याला जाब विचारला
advertisement
पुण्यात खूनासारख्या घटना दररोज घडत आहेत. बंदूका, पिस्तूल सहजपणे उपलब्ध होत आहे. शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले- पुण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने अधिकारी आणले आहेत. पुण्यातील घटनांबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली आहे. मी या भागाचे प्रतिनिधित्व करत असल्याने मी देखील या गोष्टीकडे गांभीर्याने पाहतोय. राजकीय हस्तक्षेप नसेल तर पोलिसांना काम करणे अवघड जात नाही. इथे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आम्ही होऊ देत नाही. त्याच्या सोबतीला पोलिसांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी कार्यालय, साधन सामुग्री आदी गोष्टी देऊन देखील जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर वरिष्ठ पोलिस अधिकारी कमी पडतात असे अजित पवार म्हणाले.
आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा संसार मोडला? पत्नीचे फोटो डिलिट,अनफॉलो केले
पुण्यातील अधिकाऱ्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावे. त्यांच्या जागी अन्य अधिकारी आणले जातील आणि या सर्व गोष्टींना चाप बसवला जाईल अशा इशारा दादांनी दिला. या संदर्भात पुण्यातील अधिकाऱ्यांशी आपण बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेने आमच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे आता ही आमची जबाबदारी आहे की या गोष्टी थांबल्या पाहिजेत. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी येत्या सोमवारी मुंबईत गेल्यानंतर बोलणार असल्याचे दादांनी सांगितले.