TRENDING:

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! QR कोड स्कॅन करण्याचा त्रास संपला; आता 'या' पद्धतीने अवघ्या सेकंदात होणार डिजिटल पेमेंट

Last Updated:

ThumbPay : डिजिटल पेमेंट आता आणखी स्मार्ट झाले आहेत. क्यूआर कोड किंवा मोबाईलची गरज नाही. फक्त अंगठा ठेवून व्यवहार करता येणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतातील डिजिटल पेमेंट इकोसिस्टम गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पूर्वी लोकांना व्यवहार करण्यासाठी रोख पैशांवर अवलंबून राहावे लागायचे. त्यानंतर कार्ड, वॉलेट आणि शेवटी यूपीआई यामुळे व्यवहार अगदी सहज झाले. सध्या बहुतेकजण क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करताना दिसतात. मात्र, ग्रामीण भागातील किंवा ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, अशा लोकांसाठी हे अजूनही अवघड ठरते. यावर उपाय म्हणून Proxgy या स्टार्टअपने "ThumbPay" नावाचं अनोखं प्रोडक्ट बाजारात आणलं आहे.
News18
News18
advertisement

अंगठ्याने पेमेंटची सोय

ThumbPay ही बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनवर आधारित पेमेंट प्रणाली आहे. यामध्ये ग्राहकाला फक्त आपला अंगठा डिव्हाइसवर ठेवावा लागतो. डिव्हाइस अंगठ्याचा ठसा स्कॅन करते आणि Aadhaar Enabled Payment System (AEPS) द्वारे ग्राहकाची ओळख पटवते. त्यानंतर यूपीआय प्रणाली बँक-टू-बँक व्यवहार पूर्ण करते. या प्रक्रियेमध्ये क्यूआर कोड, स्मार्टफोन, कार्ड किंवा वॉलेटची अजिबात गरज नाही.

advertisement

सुरक्षा आणि स्वच्छतेचा विचार

ThumbPay डिव्हाइसमध्ये सर्टिफाइड फिंगरप्रिंट स्कॅनर वापरण्यात आला आहे, ज्यामुळे फ्रॉड डिटेक्शनसह पेमेंट सुरक्षितपणे करता येते. शिवाय, व्हेरिफिकेशनसाठी लहान कॅमेराही बसवला आहे. डिव्हाइससोबत UV sterilization सुविधा दिली आहे, ज्यामुळे अनेक लोक एकाच स्कॅनरवर अंगठा ठेवतानाही स्वच्छता राखली जाऊ शकते.

कनेक्टिव्हिटी आणि फीचर्स

ThumbPay डिव्हाइस यूपीआय साउंडबॉक्स, क्यूआर कोड तसेच NFC पेमेंटलाही सपोर्ट करते. यामध्ये 4G आणि वायफाय कनेक्टिव्हिटीची सोय आहे. त्यामुळे मोठ्या शोरूमपासून छोट्या किराणा दुकानापर्यंत आणि ग्रामीण भागातही हे सहज वापरता येऊ शकते. डिव्हाइसची किंमत सुमारे 2,000 रुपये ठेवण्यात आली आहे आणि हे बॅटरीवर चालते. ज्यांचं बँक अकाउंट आधारशी लिंक आहे ते फक्त अंगठा वापरून व्यवहार करू शकतात.

advertisement

ग्राहकांना होणारे फायदे

ThumbPay मुळे व्यवहार करणे अधिक सोपे आणि सुरक्षित होणार आहे. विशेषतहा ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी, ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेटची सुविधा नाही, त्यांना ही तंत्रज्ञान खूप उपयुक्त ठरणार आहे. आता बँकेत रांगा लावण्याची किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही, फक्त अंगठा वापरून पेमेंट होईल.

ऑनलाइन घरभाडे भरण्यात मोठा बदल

advertisement

ThumbPayसोबतच आणखी एका महत्त्वाच्या बदलाची घोषणा झाली आहे. अनेक वर्षांपासून ग्राहक क्रेडिट कार्डद्वारे फोनपे, पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज, अमेझॉन पे आणि क्रेड सारख्या अॅप्सवरून थेट घरभाडे भरत होते. ही सुविधा खूप लोकप्रिय होती कारण यामुळे ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट्स मिळत होते तसेच 20-30 दिवसांचा व्याजमुक्त कालावधीही मिळायचा.

मात्र, आता ही सुविधा बंद करण्यात आली आहे. फिनटेक कंपन्यांनी स्पष्ट केलं की या सेवेमुळे मोठ्या प्रमाणात शुल्क आकारावे लागत होते आणि बँकांच्या नियमांचे पालन करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे कंपन्यांनी क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्याची सुविधा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! QR कोड स्कॅन करण्याचा त्रास संपला; आता 'या' पद्धतीने अवघ्या सेकंदात होणार डिजिटल पेमेंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल