किती वर्ष झालं राबवतात उपक्रम?
मालुसरे हे पाच वर्ष झाली हा उपक्रम राबवत आहेत. समाजातील काही वंचित मुलं आहेत, रस्त्यावर झोपतात, काम करतात आणि रस्त्यावर राहतात. आपण घरात मोठ्या प्रमाणात सण साजरे करत असतो. त्या मुलांना या सर्व गोष्टी काही भेटत नाहीत. त्यांचा सण हा आपण साजरा करत असतो. त्यांच्या साठी काम करतो ही गोष्ट समाधान देणारी आहे, असे मालुसरे सांगतात.
advertisement
5 हजार मजुरांची दिवाळी झाली गोड, पुण्यातील 'महा एनजीओ'चा अनोखा उपक्रम
कुठल्या वयोगटातील आहेत मुलं?
लक्ष्मी रोड वरील दुकानात नेऊन त्यांच्या आवडीचे कपडे व दिवाळीचा फराळ हा त्यांना वाटप केल जातो. 40 पेक्षा अधिक मुलांना हे दिलं जातं. मंडई, शिवाजीनगर, लक्ष्मी रोड या भागातील मुलांना हे वाटप होतं. 1 ते 15 या वयोगटातील मुलांसाठी आणि त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील करणार आहे. एसएसपीएमएस या शाळेच्या लोकांचा त्यांच्याशी संपर्क झाला आहे. तर हा उपक्रम दिवाळी झाल्या नंतर सुरु करणार आहे, असंही मालुसरे यांनी सांगितलं.
उपक्रमाचा उद्देश काय?
समाजातील लोकांचं आपण काही तरी देणं लागतो. या भावनेतून हा उपक्रम सुरु केला आहे. आपण जसं आपल्या घरातल्या, आजूबाजूच्या लोकांना मदत करतो. त्याच पद्धतीने यांना देखील मदत करून ते या गोष्टीपासून वंचित राहू नयेत, हा या पाठीमागचा उद्देश आहे, असं मंडई सांस्कृतिक कट्ट्याचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे सांगतात.





