दिवाळीत कर्णकर्कश फटाक्यांचा आवाजामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण होते. यालाच आळा घालण्यासाठी पर्यावरणस्नेही फटाक्यांची निर्मिती केली जाते. मात्र, पर्यावरणस्नेही फटाके देखील प्रदूषण करत असल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने केलेल्या चाचणीतून पुढे आली आहे.
दिवाळीत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून दरवर्षी पर्यावरणस्नेही फटाक्यांचा आवाजाची चाचणी केली जाते. यंदा प्रदूषण मंडळाकडून गोळीबार मैदानाच्या बाजूला धोबी घाटावर फटाक्यांचा आवाजाची चाचणी घेण्यात आली. मात्र, या चाचणीत सर्वच प्रयवरणसेही फटाके देखील प्रदूषण करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
advertisement
कुठे, किती ध्वनी मर्यादा?
नागरी वस्ती भागात दिवसा 55 तर रात्री 45 डेसिबल पर्यंतचा आवाज हा प्रदूषण. तर शांतता क्षेत्र असलेल्या भागात हा आवाज दिवसा 50 आणि रात्री 40 पर्यंत प्रदूषणात म्हणून गृहीत धरला जातो. व्यावसायिक क्षेत्रात दिवसा 65 तर रात्री 55 आणि औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 तर रात्री 70 डेसिबल ध्वनिमर्यादा आहे. या सर्व विभागातील ध्वनिमर्यादेपेक्षा छोट्या फटाक्यांचा आवाज देखील मोठा आहे.
या फटाक्यांचा सर्वाधिक आवाज
प्रदूषण मंडळाने केलेल्या आवाजाच्या चाचणीत 20, 22, 25 आणि 27 फूट अशा विविध अंतरावरून आवाजाची मर्यादा मोजण्यात आली. यात सर्वाधिक 99.3 डेसिबल आवाज पाचशेच्या लडीचा झाला. तर सिंगल शॉट मुळे 87.3, लवंगीच्या 24 च्या लडीचा आवाज 85.3 डेसिबल, सुतळी बॉम्ब 78.1 डिसेबल, लक्ष्मी बॉम्ब 71.1 डेसिबल, रॉकेट 72 डेसिबल आणि विविध रंगाचे पाऊस 66 डेसिबल असे नोंदविण्यात आले.