दिवाळीला आकर्षक रांगोळीनं सजवा अंगण, झटपट काढता येतील या 5 डिझाईन
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पांजरपोळ येथे महाराष्ट्र गोसेवा समिती आणि देशी गोवंश कल्याण समितीच्या वतीने दिवाळीनिमित्त पंचगव्य शाही स्नानचे आयोजन करण्यात आलंय. हे पंचगव्य स्नान दिवाळी संपेपर्यंत चालणार आहे. या शाही स्नानात हजारोंच्या संख्येनं लहान मुले, तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील सहभाग घेतल्याचे पाहिला मिळत आहे.
advertisement
दिवाळी घर सजावटीसाठी खरेदी करायचाय ट्रेंडींग आकाशकंदील? पुण्यात 'या' मार्केटला द्या भेट
पंचगव्य स्नान नेमकं काय ?
या पंचगव्य स्नानामध्ये प्रामुख्याने गाईचे शेण, गोवऱ्याची राख, दही, तूप, गुलाब पाणी, तुळशीपत्र, जास्वंद, गोमूत्र, कोरफड, लिंबू , मध, हळद आणि कडुनिंब यांचा मिश्रण करून त्याचं लेप अंगावर लावला जातो आणि सूर्यप्रकाशात काही वेळ बसून नंतर अंघोळ केली जाते. परंमपरागत चालत आलेले हे स्नान असून त्याला वैज्ञानिक आधार देखील आहे. या पंचगव्य स्नानातून अनेक त्वचेचे विकार नष्ट होतात, अशी माहिती सहभागी नागरिकांनी दिलीय.





