दिवाळीला आकर्षक रांगोळीनं सजवा अंगण, झटपट काढता येतील या 5 डिझाईन
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिवाळीला संस्कार भारती, ठिपक्यांची रांगोळी अगदी सोप्या पद्धतीनं काढून अंगण सजवू शकता.
वर्धा, 7 नोव्हेंबर: भारतात सणांना रांगोळी काढण्याची परंपरा खूप जुनी आहे. सध्या दिवाळीचा सण जवळ आला आहे आणि कामातील व्यस्ततेमुळे मोठ्या रांगोळ्या काढणे शक्य नसतं. त्यामुळे पोर्चमध्ये किंवा अंगणात काढण्यासाठी सोपी आणि आकर्षक रांगोळी कशी असावी याचा विचार आपण करत असतो. दिवाळीनिमित्त आपण अशाच रेखाटायला सोप्या 5 रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. वर्धा येथील रांगोळी कलाकार वृषाली बकाल यांनी याबाबत खास टिप्स सांगितल्या आहेत.
गृहिणी दिवाळीच्या कामात व्यस्त
दिवाळीच्या सणामध्ये घरोघरी रांगोळ्या सजतात. दिवाळी प्रत्येक घरी आकर्षक रांगोळी काढली जाते. माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी मोठमोठ्या रांगोळी काढल्या जातात. दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येक घरातील गृहिणी फराळ किंवा स्वच्छता या कामांमध्ये व्यस्त दिसून येते. या सर्व व्यस्ततेमुळे रांगोळीसाठी वेळ मिळत नाही.
advertisement
रांगोळ्यांमध्ये आकर्षक रंग
रांगोळीमध्ये भरलेल्या रंगांनी रांगोळी अधिकच खुलून दिसत असते. त्यामुळे रांगोळ्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे कॉम्बिनेशन करून रांगोळी अधिक आकर्षक बनविली जाते. मात्र व्यस्ततेमुळे रांगोळी काढावी कशी हे देखील अनेकदा सुचत नसतं. त्यामुळे वेळेत वेळ वाचवणारी रांगोळी सहजच कोणीही काढू शकेल. या रांगोळ्यांमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे आकर्षक रंग भरून पोरस किंवा अंगणामध्ये काढणे सोपे होईल.
advertisement
ठिपक्यांची रांगोळी, संस्कार भारती अशा प्रकारच्या रांगोळी तुम्ही अगदी पाच मिनिटांत काढू शकता. तसेच रांगोळीसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे सेट मिळतात तेही वापरू शकता. मात्र, स्वत:च्या हातानं रांगोळी रेखाटण्याचा आनंद घ्यायचा असेल तर सोप्या पद्धतीनं 5 प्रकारची रांगोळी रेखाटता येते, असे रांगोळी कलाकार वृषाली बकाल सांगतात.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
Nov 07, 2023 10:42 AM IST







