फक्त चाळणीचा वापर करून काढा आकर्षक रांगोळी, पाहा दिवाळी स्पेशल टिप्स
- Published by:News18 Marathi
Last Updated:
रांगोळी काढणे ही एक कला असून दिवाळीत आवर्जून अंगणात रांगोळी काढली जाते.
कोल्हापूर, 7 नोव्हेंबर: दिवाळी स्पेशल रांगोळी काढायची म्हंटले की घरातल्या मुली आणि गृहिणींना थोडेफार टेन्शनच येत असतं. त्या रांगोळीसाठी लागणारे साहित्य, वेगवेगळ्या रंगाची रांगोळी सगळे काही नीट आहे का हे पाहावे लागते. अशातच रांगोळीची एखदी नवीन डिझाईन सुचणे आणि अगदी कमी वेळेत ती काढणे हेही अवघड होऊन जाते. त्यासाठीच कोल्हापूरच्या प्रतीक कांबळे या रांगोळी आर्टिस्टने सुंदर आणि अगदी कमी वेळेत फक्त एका चाळणीचा वापर करुन रांगोळी कशी काढावी, हे सांगितले आहे.
कोल्हापूरचा प्रतीक कांबळे हा मोठमोठ्या आणि अतिशय सुंदर फ्रिस्टाईल रांगोळ्या काढतो. यामध्ये संस्कार भारती रांगोळी, स्प्रेड रांगोळी, चाळणीचा वापर करून काढलेली रांगोळी अशा अनेक पद्धतीच्या रांगोळ्या तो काढत असतो. या रांगोळी काढताना वापरलेली रंगसंगती आणि मुक्त पद्धतीने वापरलेली कला यामुळे या सर्व रांगोळ्या अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसतात. दिवाळीनिमित्त अशी सुंदर रांगोळी आपल्याही दारात असावी असे प्रत्येकाला वाटू शकते. त्यामुळेच प्रतिकने सोप्या पद्धतीने अशी सुंदर रांगोळी काढण्याची युक्ती सांगितलेली आहे.
advertisement
अशी काढा चाळण वापरून सोप्या पद्धतीने रांगोळी
प्रतिकने सांगितलेल्या पद्धतीने रांगोळी काढण्यासाठी प्रथम रांगोळी काढण्यासाठीची जागा साफ करुन घ्यावी. आपल्या घरातील छोटी-मोठी आपल्याला शक्य ती चाळण घेऊन तिचा वापर रांगोळी काढण्यासाठी करावा. चाळणीमध्ये पांढरी रांगोळी घेऊन आपण जशी एखाद्या पेनाने हवी तशी डिझाईन काढतो, तशीच डिझाईन चाळणीतून पडणाऱ्या पांढऱ्या रांगोळीच्या माध्यमातून काढावी. त्यानंतर शक्य असेल त्या ठिकाणी वेगवेगळे रंगदेखील आपण भरू शकतो.
advertisement
वेगवेगळ्या आकर्षक रंगांचा करा वापर
सध्या बाजारात अनेक पद्धतीच्या रांगोळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर वेगवेगळे रंग देखील आपल्याला बाजारात विकत मिळतात. त्यामुळे उठावदार रंगसंगती वापरून आपल्या रांगोळीला आपण आकर्षक बनवू शकतो, असे प्रतिकने बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, रांगोळी काढणे ही एक कला आहे. प्रत्येकाला अगदी छान अशी रांगोळी जमेलच असे होत नाही. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने सोपी आणि सुंदर रांगोळी काढू शकतो, तशा पद्धतीने रांगोळी काढण्याचा आनंद सणउत्सवाच्या काळात लुटायला हवा.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 07, 2023 8:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
फक्त चाळणीचा वापर करून काढा आकर्षक रांगोळी, पाहा दिवाळी स्पेशल टिप्स