advertisement

Abhishek Sharma : 'मला टेस्ट क्रिकेट खेळायचं...', ODI वर्ल्ड कपवर बोलताना काय म्हणाला अभिषेक शर्मा?

Last Updated:

Abhishek Sharma dreams to play test cricket : केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केल्यास संघात स्थान मिळवणं कठीण जात नाही, असंही अभिषेक शर्मा म्हणतो. यावेळी त्याने भविष्यातील प्लॅन सांगितला.

Abhishek Sharma dreams to play test cricket
Abhishek Sharma dreams to play test cricket
Abhishek Sharma On ODI world cup 2027 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपस्पर्धेच्या सुरुवातीला अभिषेकला म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती, ज्यामुळे त्याच्यावर फायनल सामन्यात काही प्रमाणात दडपण होतं. मात्र, अभिषेकने खचून न जाता आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं आणि अखेरीस दमदार पुनरागमन करून दाखवलं. "सुरुवात चांगली झाली नसली तरी शेवट गोड झाला," असं म्हणत अभिषेकने आगामी काळात देशासाठी आणखी अनेक ट्रॉफी जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्याला वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळायचं आहे का? असा सवाल विचारला गेला.

युवराज सिंगचा सल्ला

अभिषेक शर्माने यावेळी युवराज सिंगचा सल्ला लक्षात ठेवला. अभिषेक शर्माच्या यशामागे युवराज सिंह यांचा मोठा हात असून, त्यांनी दिलेल्या 'प्रोसेस'वर लक्ष देण्याच्या सल्ल्याचा त्याला मोठा फायदा झाला, असं सांगितलं. केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केल्यास संघात स्थान मिळवणं कठीण जात नाही, असंही अभिषेक शर्मा म्हणतो. भविष्यातील मोठ्या प्लॅनचा विचार करण्यापेक्षा सध्या मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, असं अभिषेक शर्मा म्हणाला आहे. त्यावेळी त्याने बोलता बोलता हिंट दिली.
advertisement

मला तिन्ही फॉरमॅट खेळायचं - अभिषेक शर्मा

माझं शेवटचं लक्ष आहे की, टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळायचं. मला टीम इंडियासाठी टेस्ट क्रिकेट आणि वनडे क्रिकेट देखील खेळायचं आहे. मी फक्त माझ्या प्रदर्शनावर लक्ष देतो आणि ज्या गोष्टी माझ्या हातात नाही, त्या गोष्टींची चिंता मी करत नाही, असं अभिषेक शर्माने मनमोकळ्यापणे सांगितलं. भविष्यातील मोठ्या प्लॅनचा विचार करण्यापेक्षा सध्या मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणं हेच एक ध्येय आहे, असंही अभिषेक शर्माने म्हटलं आहे.
advertisement

अभिषेक आणि टेस्ट विचित्र समीकरण

दरम्यान, अभिषेक शर्मा आणि टेस्ट क्रिकेट हे विचित्र समीकरण जरी वाटत असलं तरी देखील अभिषेकला टेस्ट क्रिकेटमध्ये खेळताना पाहणं रोमांचक असणार आहे. तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या स्कॉडमध्ये अभिषेकला संधी मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. तर दुसरीकडे यशस्वी जयस्वालला टीम इंडियामधून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची चर्चा देखील सुरू झालीये.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma : 'मला टेस्ट क्रिकेट खेळायचं...', ODI वर्ल्ड कपवर बोलताना काय म्हणाला अभिषेक शर्मा?
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement