Pune News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! आता पायपीट थांबणार; नीलकंठेश्वरच्या पायथ्यापर्यंत धावणार 'पीएमपी'
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील पर्यटकांचे आणि भाविकांचे आवडते ठिकाण असलेल्या श्री क्षेत्र नीलकंठेश्वर मंदिरासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) ही मोठी आनंदाची बातमी दिली आहे.
पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील पर्यटकांचे आणि भाविकांचे आवडते ठिकाण असलेल्या श्री क्षेत्र नीलकंठेश्वर मंदिरासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) ही मोठी आनंदाची बातमी दिली आहे. स्वारगेट ते नीलकंठेश्वर मंदिर या मार्गावर आता थेट बससेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होणार आहे.
मंदिराच्या पायथ्यापर्यंत बसचा प्रवास
आतापर्यंत नीलकंठेश्वरला जाण्यासाठी खाजगी वाहनांचा किंवा पायपिटीचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, महापौर मंजूषा नागपुरे यांच्या सूचनेनुसार ही नवीन बससेवा आखण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बस केवळ मुख्य रस्त्यापर्यंत न थांबता थेट मंदिराच्या पायथ्यापर्यंत जाणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला भाविकांची मोठी सोय होणार आहे.
advertisement
ही बससेवा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, उपसभापती दगडू करंजावणे आणि मुळशीचे माजी सभापती महादेव कोंढरे यांच्यासह मंदिर समितीने सातत्याने पाठपुरावा केला होता. सरपंच सविता शिंदे आणि उपसरपंच कोमल मानकर यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
advertisement
नीलकंठेश्वर हे ठिकाण निसर्गरम्य असून तिथे असलेल्या विविध देवदेवतांच्या मूर्तींमुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते. आता पीएमपीने स्वस्त आणि मस्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने पर्यटनाला अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 8:38 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! आता पायपीट थांबणार; नीलकंठेश्वरच्या पायथ्यापर्यंत धावणार 'पीएमपी'










