दिवाळीत अंगण दिसेल खास, 2 मिनिटांत काढा ही सुंदर रांगोळी, Video

Last Updated:

दिवाळीत अंगणात आवर्जून रांगोळी काढली जाते. आपल्यालाही आवड असेल तर ही सोपी पद्धत नक्की ट्राय करा.

+
दिवाळीत

दिवाळीत अंगण दिसेल खास, 2 मिनिटांत काढा ही सुंदर रांगोळी, Video

कोल्हापूर, 6 नोव्हेंबर : दिवाळीत जसे दिव्यांना, फराळातील विविध पदार्थांना महत्त्व आहे, तितकेच महत्त्व या दिवसात अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळीला देखील आहे. महिलांमध्ये तर जणू सर्वात सुंदर रांगोळी कुणाची यावर स्पर्धाच सुरू असते. अशातच रांगोळीची एखदी नवीन डिझाईन सुचणे आणि अगदी कमी वेळेत ती काढणे हेही अवघड होऊन जाते. त्यासाठीच कोल्हापूरच्या प्रतीक कांबळे या रांगोळी आर्टिस्टने सुंदर आणि अगदी कमी वेळेत रांगोळी कशी काढावी हे सांगितले आहे.
कोल्हापूरचा प्रतीक कांबळे हा मोठमोठ्या आणि अतिशय सुंदर फ्रिस्टाईल रांगोळ्या काढतो. यामध्ये संस्कार भारती रांगोळी, स्प्रेड रांगोळी, चाळणीचा वापर करून काढलेली रांगोळी अशा अनेक पद्धतीच्या रांगोळ्या तो काढत असतो. या रांगोळी काढताना वापरलेली रंगसंगती आणि मुक्त पद्धतीने वापरलेली कला यामुळे या सर्व रांगोळ्या अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसतात. दिवाळीनिमित्त अशी सुंदर रांगोळी आपल्याही दारात असावी असे प्रत्येकाला वाटू शकते. त्यामुळेच प्रतिकने सोप्या पद्धतीने अशी सुंदर रांगोळी काढण्याची युक्ती सांगितलेली आहे.
advertisement
कशी काढाल सोप्या पद्धतीने रांगोळी
प्रतिकने सांगितलेल्या पद्धतीने अगदी 2 मिनिटाच्या आत आपण सुंदर अशी रांगोळी काढू शकतो. त्यासाठी प्रथम रांगोळी काढण्यासाठीची जागा झाडू मारुन साफ करुन घ्यावी. हवे असल्यास पाणी मारुन धूळ बाजूला करावी. त्यानंतर एका ठिकाणी सेंटर ठरवून वेगवेगळे रंग वापरून रांगोळी स्प्रेड करावी. त्यानंतर एका खराब खाद्य तेलाच्या किंवा इंजिन ऑईलच्या डब्याला एका सरळ ओळीत आपल्याला हवी तितकी छिद्र पाडून त्यात पांढरी रांगोळी भरून घ्यावी. याच डब्याच्या साहाय्याने आपण वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन काढू शकतो. आपल्याला शक्य ती डिझाईन आपण स्प्रेड केलेल्या रांगोळीवर काढू शकतो.
advertisement
मिळेल त्या साहित्याचा करावा वापर
सध्या बाजारात अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त छिद्र असलेले रांगोळीचे अनेक प्रकारचे साहित्य मिळू शकते. मात्र आपल्याला शक्य असल्यास असे साधन आपण सहजपणे घरीच बनवू शकतो, असे प्रतिकने बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, रांगोळी काढणे ही एक कला आहे. प्रत्येकाला अगदी छान अशी रांगोळी जमेलच असे होत नाही. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने सोपी आणि सुंदर रांगोळी काढू शकतो, तशा पद्धतीने रांगोळी काढण्याचा आनंद सणउत्सवाच्या काळात लुटायला हवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
दिवाळीत अंगण दिसेल खास, 2 मिनिटांत काढा ही सुंदर रांगोळी, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement