याच्यापुढे तर बुलेट काहीच नाही, कोल्हापूरांकडे जगात भारी गाड्या, PHOTOS
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
आपल्या घरातली एखादी जुनी गाडी सांभाळून आणि जपून ठेवायला काही जणांना आवडत असते. या गाड्यांच्या मालकांचा कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब आहे.
आपल्या घरातली एखादी जुनी गाडी सांभाळून आणि जपून ठेवायला काही जणांना आवडत असते. अशाच प्रकारच्या विंटेज गाड्या जपणाऱ्यांची संख्या कोल्हापुरात मोठी आहे. या गाड्यांच्या मालकांचा कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब आहे.
advertisement
advertisement
वस्तू असो वा गाड्या, त्या सुस्थितीत राहण्यासाठी त्यांची योग्य प्रकारे देखभाल करावी लागते. विंटेज गाड्यांच्या जतन, संवर्धनाच्या उद्देशाने सन 2016 सालापासून कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब सुरू करण्यात आला होता. या क्लबमध्ये 1936 पासून 1998 पर्यंतच्या जुन्या मोटरसायकल आणि चार चाकी गाड्या समाविष्ट आहेत.
advertisement
advertisement
कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लबमधील सदस्यांकडे जुन्या काळातील दुचाकी व चार चाकी अशा सर्व विंटेज आणि क्लासिक प्रकारच्या गाड्या आहेत. यामध्ये, बीएमडब्ल्यू, बीएसए, रॉयल एनफील्ड, जावा, येझदी, वेस्पा, लॅम्ब्रेटा, यामाहा,राजदूत, लक्ष्मी 48,होंडा, विजय सुपर स्कूटर आदी दुचाकी आणि मारुती डिंकी, शेवरलेट इम्पाला अशा अनेक चार चाकी गाड्यांचाही समावेश आहे.
advertisement
advertisement
advertisement