पुणे शहराची लोकसंख्या जवळपास 75 लाख आहे.मात्र 75 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरातून जवळपास सात ते आठ लाख लोक ही दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी जातात. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लाखो पर्यटन दरवर्षी प्रवास करतात. मात्र आता पुणे विमानतळावरून विदेशात जाण्यासाठी डायरेक्ट फ्लाईट्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या सिंगापूर दुबई आणि बँकॉक सारख्या शहरांमध्ये जाण्यासाठी पुणे विमानतळावरून फ्लाइट्स उपलब्ध आहेत.
advertisement
पर्यटकांमध्ये अधिक लोकप्रिय असलेल्या व्हिएतनाम, कंबोडिया, बाली, मॉरिशस, मालदीव आणि भूतान या सौंदर्याने नटलेल्या देशातसुद्धा पर्यटनासाठी जाऊ शकता.या सर्व ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यासाठी मुंबईला न जाता पुण्यातूनच फ्लाईटची सुविधा आहे. तर अमेरिका,कॅनडा किंवा युरोप या ठिकाणी सुद्धा पर्यटक भेट देऊ शकतात. पूर्वेकडील देशाबद्दल विचार केला तर, ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड आणि जपान यापैकी कुठल्याही देशांमध्ये पर्यटनासाठी जायचं असेल तर पुण्यातून कनेक्टिंग फ्लाईट सुविधा आहे.