TRENDING:

पुण्यात आणखी एक 'अशोक खरात', जप करणाऱ्या महिलेचा उचलला फायदा, 8 महिने...

Last Updated:

नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात प्रकरण ताजं असताना पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन तोडकर, प्रतिनिधी राजगुरूनगर: नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात प्रकरण ताजं असताना पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आला आहे. शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूने महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलं आहे. याबाबत एका महिलेनं तक्रार दिली आहे.
नवनाथ गवळी
नवनाथ गवळी
advertisement

नेमकं प्रकरण काय?

​पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चांडोली येथील शिवदत्त आश्रमात 'महाराज' म्हणून मिरवणारा नवनाथ गवळी हा प्रत्यक्षात वासनांध भोंदू असल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे. एका ३४ वर्षीय महिलेने या गवळीबाबा विरुद्ध हिंमत दाखवून खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

८ महिन्यांपासून सुरू होता विकृत प्रकार

मे २०२५ पासून पीडित महिला कुटुंबासह आश्रमात दर्शनासाठी जात होती. ​१७ जुलै २०२५ रोजी पहाटे जप करत असताना आरोपीनं महिलेचा विनयभंग केला. "तुझ्या अंगातील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील," अशी अश्लील मागणी आरोपीनं केली.

advertisement

धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला, तरी प्रत्यक्षात आपल्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आता पीडितेनं केला आहे. कुटुंबाची भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे महिलेनं सुरुवातीला पूर्ण सत्य लपवलं होतं. मात्र, आरोपीकडून होणारा फोनवरचा त्रास आणि 'खरात' प्रकरणामुळे मिळालेल्या प्रेरणेतून या महिलेनं आता सर्व सत्य पोलिसांना सांगितलं आहे.

advertisement

पीडितेनं काय सांगितलं?

याबाबत प्रतिक्रिया देताना पीडितेनं सांगितलं की, "आम्ही देवाच्या श्रद्धेने तिथे गेलो होतो, पण या माणसाने अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे. अंगात येण्याचे थोतांड रचून तो महिलांचे शोषण करतो. आमच्या कुटुंबाला आता भीती वाटतेय."

तपासात असंही समोर आलं आहे की, या आश्रमात महिलांच्या 'अंगात येण्याचे' प्रकार घडवून आणले जातात. महिलांमध्ये कोणती तरी वेगळी शक्ती असल्याचे भासवून, त्यांच्या मनावर ताबा मिळवला जातो आणि मग 'दोष निवारण' करण्याच्या नावाखाली नवनाथ गवळी त्यांचे शोषण करतो.

advertisement

गुन्हा दाखल तरी आरोपी मोकाट​

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरी बसून राहण्यापेक्षा घेतला निर्णय, 60 वर्षीय आजीचा ज्वारीपासून प्रिमिक्स व्यवसाय, कमाई लाखात
सर्व पहा

खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करूनही आरोपी नवनाथ गवळी अद्याप मोकाट आहे. हे प्रकरण ​न्यायालयात असूनही आरोपी एकाही तारखेला हजर राहत नसल्याचं निष्पन्न झालं आहे. ​आरोपीच्या दहशतीमुळे पीडितेचे कुटुंब सध्या प्रचंड दडपणाखाली आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक का होत नाही? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.​

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात आणखी एक 'अशोक खरात', जप करणाऱ्या महिलेचा उचलला फायदा, 8 महिने...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल