TRENDING:

Pune News : पुण्याचा कायापालट होणार! 5 महाप्रकल्प थेट अमेरिकेच्या सिलीकॉन व्हॅलीला देणार टक्कर, असा आहे मेगाप्लॅन

Last Updated:

TOP 5 major projects in Pune : पुणे हे झपाट्याने विकसित होत असलेले शहर असून इथले अनेक महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक भविष्यास आकार देत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  पुणे शहर जे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते ते आज झपाट्याने विकसित होत आहे. हे शहर फक्त एक शैक्षणिक केंद्र नसून जगप्रसिद्ध आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. औद्योगिक क्षेत्रातही पुणे वेगाने प्रगती करत आहे. शहरात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले जात आहेत. जे महाराष्ट्राच्या भविष्यावर थेट परिणाम करणार आहेत. या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षांत पुणे इतकं विकसित होईल की शहराची ओळख बदलून जाईल.
News18
News18
advertisement

पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर असून मुंबई आणि दिल्ली प्रमाणे इथल्या घराच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. वाढत्या घरांच्या किमतींमुळे नागरिकांना जीवनमानात बदल अनुभवायला मिळतो आहे. पण याच वेळी शहराच्या सोयीसुविधा आणि पायाभूत सुविधांमध्ये भरपूर सुधारणा केली जात आहेत.

पुणे–नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वे:

पुणे आणि नाशिक दरम्यानचा प्रवास आता खूप जलद होणार आहे. 235 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर रेल्वे 200 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावेल. त्यामुळे प्रवास सुमारे 1.5 ते 2 तासात पूर्ण होईल आणि पुणे आणि नाशिकमधील संपर्क अधिक सुलभ होईल.

advertisement

पुणे स्मार्ट सिटी आणि मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प:

पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये इंटीग्रेटेड कमांड सेंटर, आधुनिक तंत्रज्ञान आणि शहरातील सर्व सुविधा समाविष्ट आहेत. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प नागरिकांना स्वच्छ नदी किनारा आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देईल. हे प्रकल्प रिअल इस्टेट क्षेत्रातही भरारी घेण्यास मदत करतील.

पुरंदर विमानतळ:

भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ पुण्यातील पुरंदरमध्ये उभारले जात आहे. हे विमानतळ डोमेस्टिक तसेच अनेक आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांशी शहराला जोडेल.

advertisement

पुणे रिंग रोड:

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १३८ किमी लांबीच्या रिंग रोडचे बांधकाम सुरु आहे. हे प्रकल्प 6 मुख्य महामार्गांना जोडून शहरातील वाहतूक आणि भविष्यातील विकासासाठी पायाभूत सुविधा तयार करेल.

पुणे मेट्रो:

पुणे मेट्रो प्रकल्पात तीन मार्गिका आहेत. PCMC ते स्वारगेट, वनाझ ते रामवाडी आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गांमुळे आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांसाठी जलद आणि सोयीची वाहतूक उपलब्ध होईल. हा प्रकल्प पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे विकसित केला जात आहे.

advertisement

आयटी हब आणि ऑटोमोबाईल उद्योगामुळे पुणे फक्त महाराष्ट्राचा नाही, तर संपूर्ण देशाचा आर्थिक केंद्र बनत आहे. मोठ्या औद्योगिक आणि आयटी कंपन्यांमुळे शहरात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे पुणे शहरात नागरी सुविधा, वाहतूक आणि व्यवसाय क्षेत्रात अभूतपूर्व विकास होणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुण्याचा कायापालट होणार! 5 महाप्रकल्प थेट अमेरिकेच्या सिलीकॉन व्हॅलीला देणार टक्कर, असा आहे मेगाप्लॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल