घटनेबाबत अधिक माहिती अशी की राहुल रिकामे याच्या बहिणीशी राजेश कांबळे या तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. या संशयावरून या दोघांनी राजेश याला बालेवाडीच्या गोल्डन टेरेस सोसायटी जवळ भेटायला बोलावले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करण्यात आले. या घटनेत राजेशचा मृत्यू झाला. आरोपींनी त्याची हत्या करून मृतदेह वाकडच्या नदीमध्ये फेकून दिला.
advertisement
दरम्यान या प्रकरणात दोन्ही आरोपींविरोधात चतुशिर्गींगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
Dec 22, 2023 9:55 AM IST
