यंदा संपूर्ण राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय आणि ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ठप्प झाली. त्यानंतर ही प्रक्रिया गुरुवारी दुपारनंतर पुन्हा सुरू होईल, असे विद्यार्थी आणि पालकांना अपेक्षित होते. परंतु, ती झाली नाही. आता अकरावीच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सोमवारपर्यंत (दि. २६) प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या नियमित प्रवेशाची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी 8 जूनला जाहीर होईल.
advertisement
Success Story : आयटी क्षेत्रातील नोकरी सोडली, आता विकतायत पाणीपुरी, महिन्यासाठी अडीच लाख कमाई
पहिल्या फेरीचे वेळापत्रक
26 मे 3 जून : विद्यार्थी अर्ज प्रक्रिया, महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे.
5 जून: तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे.
6 ते 7 जून: तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे.
8 जून: अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे.
9 जून: गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थी आणि महाविद्यालय निवड आणि वाटप प्रक्रिया.
10 जून : प्रवेशासाठी महाविद्यालयनिहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर करणे. विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये महाविद्यालय वाटप होणे आणि कट ऑफ जाहीर करणे.
11 ते 18 जून : विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे. प्रवेश निश्चित करणे, प्रवेश नाकारणे आणि प्रवेश रद्द करणे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी ‘व्हॉट्स अॅप चॅनेल’
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी
'https://whatsapp.c om/channel/0029Vb B2T6DBA1etTOdyi10 C' हे अधिकृत व्हॉट्स अॅप चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलद्वारे प्रवेश प्रक्रियेतील सर्व अद्ययावत माहिती, सूचना दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती या चॅनलवर घेता येईल.
