TRENDING:

'परत इकडे फिरायचं नाही!' बारामतीत 'कपल' ला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 3 लाखांची लूट करणाऱ्या तिघांना बेड्या

Last Updated:

आरोपींनी तरूणाजवळ येत त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी सत्तूर आणि कोयत्याचा धाक दाखवला आणि पैशांची मागणी केली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात एका तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला करून त्याला लुटणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने फिर्यादी तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला सत्तूर व कोयत्याचा धाक दाखवून लुटले होते. पोलिसांनी या कारवाईत ३ लाख २४ हजार रुपयांचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
News18
News18
advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार, ही थरारक घटना ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८:४० वाजण्याच्या सुमारास घडली. मूळचे नागपूरचे असलेले आणि सध्या कामासाठी बारामतीत वास्तव्यास असलेले २६ वर्षीय तरुण आपल्या मैत्रिणीसह तांदुळवाडी विमानतळ रोडवरील एलसी कंपनी लेकच्या मोकळ्या जागेत बसले होते. परिसर निर्जन असल्याने याचाच फायदा घेत तीन अज्ञात इसम तिथे पोहोचले. या तिघांनीही ओळख पटू नये यासाठी तोंडाला मास्क आणि रुमाल बांधले होते.

advertisement

कोयत्याने वार करून दहशत

आरोपींनी तरूणाजवळ येत त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी सत्तूर आणि कोयत्याचा धाक दाखवला आणि पैशांची मागणी केली. तरुणाने या लूटमारीला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता एका आरोपीने त्यांच्या डाव्या पायावर कोयत्याने जोरदार वार केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. आरोपींनी तरुणाच्या गळ्यातील ३ लाख रुपये किमतीची २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १५ हजार रुपयांची चांदीची चैन, ५ हजार आणि २ हजार रुपयांच्या दोन चांदीच्या अंगठ्या आणि खिशातील २ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. 'पुन्हा या परिसरात दिसायचं नाही', अशी धमकी देत आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

advertisement

पोलिसांची धडाकेबाज कारवाई

या घटनेनंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विमानतळ रोडसारख्या गजबजलेल्या परिसराजवळ ही घटना घडल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवलीय तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला आणि तिघांनाही बेड्या ठोकल्या. आरोपींकडून लुटलेले सर्व दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

 संशयास्पद हालचाली दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

advertisement

नागरिकांनी सावध राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामती पोलिसांनी केले आहे. या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
असं गाव जिथे फोडली जाते एकमेकांडी डोकी, रक्त निघालं तर मानता देवीचा प्रसाद!
सर्व पहा

विधवा महिला मुलीसह झोपलेली, ‘तो’ मध्यरात्री आला अन्...छत्रपती संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ, संतापाचे वातावरण

मराठी बातम्या/पुणे/
'परत इकडे फिरायचं नाही!' बारामतीत 'कपल' ला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 3 लाखांची लूट करणाऱ्या तिघांना बेड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल